ETV Bharat / state

कोरोनाकाळातील गांधी जयंती सेमाग्राममध्ये 'अशा' पद्धतीने होणार साजरी

महात्मा गांंधी यांची जंयती यंदाच्या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांचे पालन करत मास्क वापरत सामाजिक अंतर ठेवत महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

बापू कुटी
बापू कुटी
author img

By

Published : Sep 29, 2020, 8:57 PM IST

Updated : Sep 30, 2020, 10:04 AM IST

वर्धा - येथील सेवाग्राम म्हणजे महात्मा गांधींची कर्मभूमी. या भूमीत गांधी जयंती म्हणजे विचारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत विचार पोहोचवण्याची एक महत्वाचा क्षण. पण, यंदा कोरोनाचा सावट असल्याने मास्क आणि सामाजिक अंतर ठेवून साध्या पद्धतीने होणार आहे. यंदा कोणीही मार्गदर्शक नाही. पण, यंदा विशेषतः म्हणून गांधींजींचे सेवाग्राम गावात आणि बनारस विद्यापीठातील पहिले भाषणाच्या प्रति वाटप होणार असून त्याचे वाचन होणार आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी
दरवर्षी महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सेवाग्राम येथील आश्रमात मोठी गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या टाळेबंदीपासून अजूनही आश्रम बंद आहे. 151वी जयंती साजरी होत असताना आश्रमाच्या परंपरेनुसार पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी नईतालीमच्या घंटा घरातून प्रार्थनेला सुरुवात होणार आहे. 6 वाजता बापुकुटी समोर प्रार्थना होईल. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत अखंड सूत यज्ञ केले जाणार आहे. या सूत यज्ञवेळी भजन कीर्तनाचे कार्यक्रम असणार आहे.सकाळी 9 वाजता 'वैष्णव जण तो' हे भजण गायले जाणार आहे. याला पालकमंत्री सुनील केदार उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी गांधी विचारक शाळकरी विद्यार्थ्यांना जयंतीदिनी मार्गदर्शन करतात. पण, यंदा याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणालाही बोलावण्यात आले नाही. या उलट सोशल डिस्टन्स आणि मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. पण, यंदा विशेषतः म्हणून महात्मा गांधींचे बनारस हिंदू विद्यापीठातील व 30 एप्रिल, 1936मध्ये सेवाग्राममध्ये त्यांनी दिलेल्या पहिल्या भाषणाच्या प्रती वाटप आणि वाचन केले जाणार आहे. यात दिवसभर भजन कीर्तन आणि सायंकाळी प्रार्थनेने दिवसाचा शेवट केला जातो.सेवाग्राम आश्रमाच्या कार्यक्रमासह यंदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील वास्तूंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण केले जाणार आहे. यासह त्याच्या विचाराची व्याप्ती पोहचवण्यासाठी ऑनलाइन वेबिनार आणि विविध कार्यक्रमासह सप्ताह साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा - वर्ध्यात बैलगाडीला कार धडकली; महिलेचा मृत्यू, तिघे जखमी

Last Updated : Sep 30, 2020, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.