ETV Bharat / state

वर्ध्याच्या चिमुकलीला भेटला शिक्षकाच्या रुपात देव! कॅन्सरच्या उपचारांसाठी केली मदत

कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र, आजही कॅन्सरचे नाव ऐकले तरी भीतीने हातपाय गळून जातात. मात्र, वर्ध्यातील एका १०वर्षीय मुलीने या दुर्धर आजारावर मात केली आहे. यासाठी तिच्या शिक्षकांनी तिला मदत केली.

Dnyaneshwari and her teacher
ज्ञानेश्वरी आणि तिचे शिक्षक
author img

By

Published : Dec 6, 2020, 4:16 PM IST

वर्धा - आर्वी तालुक्यातील कर्माबादच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या0 10 वर्षीय चिमुकलीला कॅन्सरने ग्रासले. तिच्या कौटुंबीक परिस्थितीची जाणीव असल्याने तिच्या शिक्षकाने स्वतः पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी धडपड केली. शिक्षक आणि काकाने मिळवलेल्या मदतीतून या मुलीवर यशस्वीपणे उपचार झाले आहेत. एरवी ज्ञान दानाचे काम करणारे उमेश दगडकर हे शिक्षक कॅन्सरग्रस्त चिमुकलीसाठी जणू देवच झाले आहेत.

वर्ध्याच्या चिमुकलीला तिच्या शिक्षकाने कॅन्सरच्या उपचारांसाठी मदत केली

कर्माबाद येथील 10 वर्षाची ज्ञानेश्वरी टुले ही मुलगी प्राथमिक शाळेत शिक्षण घेते. तिचे कुटुंब अतिशय सामान्य आहे. तिचे वडील सुतारकाम करून हातावर आपले कुटुंब चालवतात. शाळेत नेहमी हसत-खेळत प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या ज्ञानेश्वरीला 10 महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडली. शिक्षक उमेश दगडकर यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तिच्या वडिलांना दवाखान्यात नेण्यास सांगितले. तिच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. यात तिला रक्ताचा कॅन्सर असल्याचे निदान झाले.

रिपोर्ट पाहिला अन् शिक्षक चक्रावून गेले -

ज्ञानेश्वरीचा रिपोर्ट सर्व प्रथम तिच्या शिक्षकांनी पाहिले. उमेश दगडकर यांना रिपोर्ट पाहून धक्का बसला. त्यांनी तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. मात्र, हातावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या वडील धनराज टुले यांना मुलीचा उपचार कसा करावा, असा प्रश्न पडण्यापूर्वीच शिक्षक उमेश यांनी यावर उपाय शोधला. उमेश यांनी ज्ञानेश्वरीचे काका अनुप यांच्या सोबतीने तिच्या उपचारांसाठी मदत मिळवण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या शब्दावर विश्वास ठेवत अनेकांनी मदतीचा हात पुढ केला. या मदतीतून ज्ञानेश्वरीच्या उपचारांसाठी 2 लाख 47 हजार रुपये जमा झाले.

अनेकांनी दिला मदतीचा हात -

टुले कुटुंबीयांच्या परिस्थितीची जाणीव असल्याने शिक्षक उमेश दगडकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापक सुनंदा चवरे यांच्याशी चर्चा करून मदत मिळवण्यास सुरवात केली. शिक्षक संघटना, शिक्षणाधिकारी, नातेवाईक यांनी मदतीचा हात पुढे केला. तिच्या आईने सोने गहाण ठेवले. सोने गहाण ठेवण्याचे कारण समजताच सोनारानेही व्याज न आकारण्याचा निर्णय घेऊन मदत केली.

कुठे झाले ज्ञानेश्वरीवर उपचार?

सुरुवातीला ज्ञानेश्वरीला नागपुरात नेण्यात आले. मात्र, उपचाराचा खर्च न झेपावणारा होता. यामुळे तिचे काका अनुप टुले यांनी माहिती काढली आणि तिला मुंबईला नेले. तिथे टाटा हॉस्पिटलमध्ये 'इम्पॅक्ट सामाजिक संस्थे'च्या माध्यमातून तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तिथेही संकटांनी तिची पाठ सोडली नाही. कॅन्सरमधून बरी होत असताना ज्ञानेश्वरीला कोरोनाने ग्रासले. मात्र, तिने कोरोनालाही हरवले. 10 महिन्याच्या उपचारात जवळपास हजार इंजेक्शन घेऊन तिच्या शरीराची चाळणी झाली. तरीही तिने मृत्यूला हरवत पुन्हा पूर्वीसारखे आयुष्य सुरू केले आहे.

मुंबईतील दिवस विसरणार नाही -

ज्ञानेश्वरीच्या उपचारानिमित्त तिचे वडील धनराज यांनी पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवले. आपल्या मुलीसाठी ते दवाखान्यात राहिले. आलेल्या कठीण प्रसंगांना सामोरे गेले. कोरोनाच्या काळात काळजी घेत तिला दवाखान्यात नेत राहिले. मुंबईतील एक-एक दिवस हा आयुष्यभर स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वरीचे वडील धनराज टुले यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.