ETV Bharat / state

मराठवाड्यात कोरोनाचा कहर; नवीन 7978 रुग्णांची भर, औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक 1964 रुग्ण - Aurangabad covid case

मराठवाड्यात 7 हजार 978 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आढळून आले.

मराठवाड्यात कोरोनाचा कहर
मराठवाड्यात कोरोनाचा कहर
author img

By

Published : Apr 11, 2021, 11:18 AM IST

औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात मराठवाड्यात 7 हजार 978 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी रुग्ण हिंगोली जिल्ह्यात आढळून आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात उच्चांकी संख्या

शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. दिवसभरात 1964 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही उच्चांकी संख्या आहे. तर दिवसभरात 25 बधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या 97, 412 इतकी झाली असून 79,895 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर 1952 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 15,565 रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शनिवारी मराठवाड्यातल्या जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी

औरंगाबाद - 1964 नवे रुग्ण, 25 जणांचा मृत्यू
नांदेड - 1759 नवे रुग्ण, 27 जणांचा मृत्यू
लातूर - 1486 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू
जालना - 652 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू
बीड - 764 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू
हिंगोली - 111 नवे रुग्ण
उस्मानाबाद - 558 नवे रुग्ण, 7 जणांचा मृत्यू
परभणी - 684 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.