ETV Bharat / state

ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी; शिळफाटा रोडवर झाला अपघात - thane accident

शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून कंटेनरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत असिम सिद्दीकी
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:15 PM IST

Updated : Oct 16, 2019, 9:43 PM IST

ठाणे - जिल्ह्यात खड्डयांमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. असिम सिद्दीकी (वय 22, रा. मुंब्रा ) असे या तरुणाचे नाव आहे.

असिमचे वडील जावेद सिद्दीकी यांची प्रतिक्रिया

मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास गाडीत पेट्रोल भरण्याकरिता बाहेर गेलेला असिम शिळफाटा रोडवरुन आपल्या घरी परतत होता. यावेळी असिमची गाडी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात आदळून तो रस्त्यावर पडला आणि आणि मागून येणाऱ्या कंटेनरने असिमच्या गाडीला जोरात धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. असिमला जवळच्याच काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या अपघात प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला आणि कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, चालका सोबतच ज्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर खड्डे पडले त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी असिमच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Intro:ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी
शिळफाटा रोडवर झाला अपघातBody:ठाण्यात खड्ड्यांमुळे आणखी एकाचा बळी
शिळफाटा रोडवर झाला अपघात

ठाणे जिल्ह्यात खड्डयांमुळे आणखी एकाचा बळी गेलाय ... शिळफाटा रोडवर हा अपघात झाला असून एका तरुणाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागलाय... असिम सिद्दीकी असं या तरुणाचे नाव असून २२ वर्षांचा असिम मुंब्रा येथे राहत होता... रात्री गाडीत पेट्रोल भरण्याकरता बाहेर गेलेला असिम शिळफाटा रोडवरुन आपल्या घरी परतत असताना रात्री १०.३० च्या सुमारास असिमची गाडी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात इतक्या जोरात आदळली की असिम रस्त्यावर पडला आणि आणि मागून येणा-या कंटेनरने असिमच्या गाडीला इतक्या जोरात धडक दिली की असिम कंटेरनच्या धडकेत गंभीर जख्मी झाला... असिमला जवळच्याच काळसेकर हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र या अपघातात असिम इतका गंभीर जख्मी झाला की उपराचा दरम्यान त्याचा मृत्यू झाला... या घटनेत पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चालकाला आणि कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतलय... मात्र चालका सोबतच ज्या अधिका-यांच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर खड्डे पडले आणि याच मुळे असिमचा जीव गेला असून त्या अधिका-यांवरही गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी असिमच्या घरच्यांनी केलीये...

बाईट १ : जावेद जिद्दीकी, असिमचे वडीलConclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.