ETV Bharat / state

बँकेतून कमी व्याजदराचे आमिष दाखवून २६ लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड - भिवंडी नारपोली पोलीस स्टेशन बातमी

आरोपी वैभवने गुगल पे वरील रक्कम व चेक पुरुषोत्तमच्या लोन अकाउंटवर न भरता परस्पर स्वतःच्या अकाउंटवर जमा केला. तसेच बजाज फायनान्स वर मंजूर झालेली कर्जाची रक्कम १२ लाख ४ हजार ९९९ रुपये हे पुरुषोत्तम ह्याच्या नावाने मुंबईतील कांजूर मार्ग येथे बनावट अकाउंट उघडले व पुरुषोत्तमच्या परस्पर पैसे काढले.

youth arrested for swindling 26 lakhs from bank by luring low interest rate in bhiwandi
बँकेतून कमी व्याजदराचे अमिष दाखवून २६ लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड
author img

By

Published : Jul 16, 2022, 10:33 PM IST

ठाणे - एका भामट्याने पैश्यांची गरज असणाऱ्या तरुणाला बँकेतून कमी व्याज दराने कर्ज काढून देतो असे सांगून प्राप्त झालेली कर्जाची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात जमा करून तरुणास २६ लाखांचा गंडा लावून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भामट्याविरोधात नारपोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वैभव मनोहर वारंग( वय ३२ रा.भांडुप पूर्व, मुंबई) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.

गुगल पेवर आणि चेक घेऊन केली फसवणूक - भिवंडीतील पुरुषोत्तम गजानन सागवेकर (३० रा.कशेळी) या तरुणास पैश्यांची तात्काळ आवश्यकता होती. त्यामुळे त्याने आरोपी वैभवशी संपर्क केला असता कमी व्याज दराने कर्ज काढून देतो असे आरोपीने भासवून विश्वास संपादन केला. त्यानुसार पुरुषोत्तमने १ जानेवारी ते ७ जुलै दरम्यान ऍक्सीस बँक आणि बजाज फायनान्समधून एकूण २६ लाख ८८ हजार ९९९ रुपयांचे कर्ज काढले व कर्जाच्या रक्कमेची परतफेड करण्यासाठी आरोपी वैभवच्या गुगल पेवर १ लाख १२ हजार ८७५ रूपये व ऍक्सीस बँकेचा १३ लाख ५४ हजार ९६० रुपये किंमतीचा चेक त्याला विश्वासाने दिला.

आरोपीने उघडले बनावट अकाउंट - आरोपी वैभवने गुगल पे वरील रक्कम व चेक पुरुषोत्तमच्या लोन अकाउंटवर न भरता परस्पर स्वतःच्या अकाउंटवर जमा केला. तसेच बजाज फायनान्स वर मंजूर झालेली कर्जाची रक्कम १२ लाख ४ हजार ९९९ रुपये हे पुरुषोत्तम ह्याच्या नावाने मुंबईतील कांजूर मार्ग येथे बनावट अकाउंट उघडले व पुरुषोत्तमच्या परस्पर पैसे काढले.

आरोपीला ७ दिवसाची पोलीस कोठडी - याप्रकरणी आरोपीत भामटा वैभव ह्यास अटक करण्यात आली असून त्यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास सपोनि प्रशांत आवारे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.