ठाणे : सडक छाप मजनूला सोडून २० वर्षीय भावाने बहिणीची छेड (girl teasing at Thane) काढण्याच्या संशयातून दुसऱ्याच ३२ वर्षीय तरुणावर भर चौकात चाकूने वार (Young Man Stabbed At Thane) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली चौकात घडली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस गुन्हा दाखल हल्लेखोर भावावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल (case registered against youth attacked) करण्यात आला. पवन पाटील (रा. सागर्ली,डोंबिवली) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर भावाचे नाव आहे. (Thane Crime) तर विठ्ठल भालेकर असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Latest news from Thane)
भावाचा संताप अनावर : ५ डिसेंबर रोजी रात्री सव्वा ९ वाजल्याच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात सडक छाप तरुणाने डोंबिवली पूर्वेकडील सागर्ली चौकात छेड (girl teasing at Thane) काढली होती. (Latest news from Thane) त्यामुळे तरुणी भयभीत होऊन तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. (Young Man Stabbed At Thane) काही वेळातच हल्लेखोर भावालाही बहिणीची छेड काढल्यामुळे संताप आला. (Thane Crime) त्यातच संतापलेला भाऊ पवन याने सागर्ली परिसरात या तरुणाचा शोध सुरू केला. (case registered against youth attacked)
आधी मारहाण, नंतर चाकूहल्ला : त्यावेळी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल भालेकर हा तरुण सागर्ली परिसरातून जात होता. याच दरम्यान हल्लेखोर पवन याने त्याला भर चौकात गाठले. विशेष म्हणजे विठ्ठलच्या वर्णनावरून हल्लेखोर पवनला संशय आल्याने काहीच विचारपूस न करता त्याने विठ्ठल ला आदी बेदम मारहाण केली. विठ्ठल पवनला का मारहाण करतोयस याबाबत विचारत होता. मात्र पवनने काही न ऐकता विठ्ठलला मारहाण सुरूच ठेवली. इतकेच नव्हे संतापाच्या भरात पवनने आपल्या जवळील चाकू काढून विठ्ठलवर हल्ला केला.
हल्लेखोराने घटनास्थळावरुन काढला पळ : या हल्ल्यात विठ्ठलच्या हाताला गंभीर दुखापत झाली. मात्र चाकू हल्ला केल्यानंतर हा तरुण आपल्या बहिणीला छेडणारा नसल्याचे माहित पडतात हल्लेखोर पवनने घटनास्थळावरुन पळ काढला. तर घटनेची माहिती मिळताच टिळक नगरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पोलीस हवालदार टिके यांनी विठ्ठलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करून हल्लेखोर पवनचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.