ETV Bharat / state

डोंबिवलीतील मृत महिलेच्या पायातील पैजणांनी उलगडले खुनाचे प्रकरण

२९ मे रोजी वसई रेल्वे रूळाजवळ शाबीरा खान या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि त्यांचे पथक यांनी आरोपीला अटक केली आहे.

हत्या झालेल्या मृत महिलेचे पैंजण
author img

By

Published : Oct 17, 2019, 6:14 PM IST

ठाणे - डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मे रोजी एका महिलेचा मृतदेह हत्या केलेल्या स्थितीत आढळून आला होता. या महिलेची हत्या करणाऱ्या तिच्या पतीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने शोधून काढण्यास पाच महिन्यात यश आले आहे. विशेष म्हणजे मृत महिलेच्या पायातील पैजणांमुळे या मारेकऱ्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. शाबीरा खान असे महिलेचे नाव आहे. तर मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख (वय- ४२) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्याचे नाव आहे.

डोंबिवलीतील मृत महिलेच्या पायातील पैजणांनी उलगडले खुनाचे प्रकरण

हेही वाचा - डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटाजवळच उलटला ट्रक; प्रवाशांमध्ये खळबळ

वसई रेल्वे रूळाजवळ शाबीरा खान या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजू जॉन आणि त्यांचे पथक यांनी तपास सुरू केला. मारेकऱ्याने घटनास्थळी कोणताही पुरावा सोडला नव्हता. मात्र मृत महिलेच्या पायातल्या चांदीच्या पैजणांवर ज्वेलर्सच्या दुकानाचा स्टँप आढळून आला.

`मलार` नामक तमिळ भाषेत असलेल्या या तामिळनाडू येथील ज्वेलर्सच्या दुकानाची माहिती पोलिसांनी इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. त्यानुसार संजू जॉन यांच्या मार्गदर्शनानुसार आणि फौजदार म्हणून यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तामिळनाडू राज्यात जाऊन दुकान शोधले. या दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत महिला, तिच्या अंगावरील कपडे आणि परिधान केलेले पैंजण यांचे पोस्टर तिरूवन्नामलाई शहरात सर्वत्र प्रसारित केले. याच भागातील राधापूरम या गावातील असलेल्या खलील शेख याने त्याची बहीण शबिरा खान (वय-५०) ही १६ मेपासून मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात केलेली होती.

शबिरा खान यांच्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रीक विश्लेषण केले असता, १४ व १६ मे रोजी कोपर रेल्वे स्थानकावर आल्याचे आणि त्यानंतर मोबाईल बंद झाल्याचे आढळून आले. त्यावर शाबिरांच्या संपर्कात असलेल्या मन्सूर शेख याच्यावर पोलिसांच्या संशयाची सुई स्थिरावली. हा मन्सूर पश्चिम बंगाल येथे मूळ गावी गेला असावा असा संशय होता. मात्र, पुन्हा तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तो केरळ राज्यातील पाईपाडलंड (कोट्टायम) भागात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेश पालटून राहणाऱ्या मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख याच्या मुसक्या आवळल्या. चौकशी दरम्यान, मृत शबिरा खान कोपर परिसरात असलेल्या चाळीमध्ये खोली घेऊन राहू असा दबाव त्याच्यावर टाकत होती. मात्र, मारेकरी मन्सूर याला कोपर परिसरात राहणे मान्य नव्हते. या कारणावरून दोघांममध्ये वारंवार वाद होत होते. अखेर तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने मन्सूर याने शबीरा शेखचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; 32 लाखांचे होते बक्षीस

Intro:kit 319Body:मृत महिलेच्या पायातील पैजणांनी उलगडला खुनाचा गुन्हा; आरोपी गजाआड

ठाणे :- डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मे रोजी एका महिलेचा मृतदेह हत्या केल्लेल्या स्थितीत आढळून आला होता. या महिलेची हत्या करणाऱ्या तिच्या पतीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण पथकाने शोधून काढण्यास पाच महिन्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या मारेकऱ्याला मृत महिलेच्या पायातील पैजणांमुळे गुन्हा उघडकीस आला आहे. शाबीरा खान असे मृतक महिलेचं नाव आहे. तर मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख ( ४२ ) असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्याचे आहे.

कोपर – वसई रेल्वे रूळाजवळ शाबीरा खान या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक पोलिसांसह कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वपोनी संजू जॉन आणि त्यांचे पथक यांनी तपास सुरु केला. मारेकऱ्याने घटनास्थळी कोणताही पुरावा मात्र मृत महिलेच्या पायात चांदीच्या पैजणांवर ज्वेलर्सच्या दुकानाचा स्टॅप आढळून आला. `मलार` नामक तमिळ भाषेत असलेल्या या तामिळनाडू येथील ज्वेलर्सच्या दुकानाची माहिती पोलिसांनी इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. त्यानुसार वपोनी संजू जॉन यांच्या मार्गदर्शनानुसार आणि फौजदार मुद्गून यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तामिळनाडू राज्यात जाऊन दुकान शोधले. या दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला, तिच्या अंगावरील कपडे आणि तिने परिधान केलेले पैजण यांचे पोस्टर तिरूवन्नामलाई शहरात सर्वत्र प्रसारित केले. याच भागातील राधापूरम या गावातील असलेल्या खलील शेख याने त्याची बहीण शबिरा खान (५०) ही १६ मे पासून मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
शबिरा खान हिच्या मोबाईल क्रमांकावरून तांत्रीक विश्लेषण केले असता १४ व १६ मे रोजी कोपर रेल्वे स्थानकावर आल्याचे आणि त्यानंतर मोबाईल बंद झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी शाबिराच्या संपर्कात असलेल्या मन्सूर शेख याच्यावर संशयाची सुई स्थिरावली. हा मन्सूर पश्चिम बंगाल येथे मूळ गावी गेला असावा असा संशय होता. मात्र पुन्हा तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तो केरळ राज्यातील पाईपाडलंड (कोट्टायम) भागात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेश पालटून राहणाऱ्या मन्सूर रेहमान इसाअली उर्फ मन्सूर इसा आली शेख याच्या मुसक्या आवळल्या. चौकशी दरम्यान मृतक शबिरा खान हिला कोपर परिसरात असलेल्या चाळीमध्ये खोली घेऊन राहू असा दबाव त्याच्यावर टाकत होती. मात्र मारेकरी मन्सूर याला कोपर परीसरात राहणे मान्य नव्हते. या कारणावरून दोघांममध्ये वारंवार वाद होत होते. अखेर तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने मन्सूर याने शबीरा शेखचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे माहिती पोलिसांनी दिली.

बाईट :- ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त

Conclusion:mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.