ठाणे : मृतक गंगा शिंदे ह्या कल्याण पश्चिम भागात कुटूंबासह राहतात. त्यांनी घरगुती कारणावरून विष प्राशन केल्याने तीच्या नातेवाईकांनी उपचारासाठी गुरुवारी कल्याण पश्चिम बिर्ला कॉलेज रोडवरील साई संजिवनी या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज अचानक आज दुपारच्या सुमारास उपचारदरम्यान गंगाचा मृत्यू (Woman dies during treatment ) झाला. त्यानंतर उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी (Sabotage of hospital by relatives) केली रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टर आणि नर्सला बेदम मारहाण (doctor brutally beaten) केली.
कायदेशीर कारवाई करण्यात येणार : दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून चौकशी सुरु केली आहे. शिवाय कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिलेला विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करून घेतले. मात्र डॉक्टरानी घटनेची माहिती पोलिसांना दिली नसल्याने डॉकटरची देखील चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.