ETV Bharat / state

Woman Cheating By Mantrik In Pune: भोंदू मांत्रिकांनी पूजेच्या नावाखाली घातला महिलेला गंडा, त्रिकुट मांत्रिकांचा शोध सुरू - Woman Cheating By Mantrik In Pune

स्वत:ला ऋषी असल्याचे भासवून भोंदू मांत्रिकांनी एका महिलेच्या घरातील कथित नकारात्मक ऊर्जा पळवून लावण्यासाठी तंत्रमंत्र आणि पूजा करत ५० हजाराचा गंडा घातला. ही घटना भिवंडीतील कशेळी भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी भामट्या त्रिकुट भोंदू मांत्रिकांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. छोटे लाल यादव, लालू यादव, हिरालाल यादव असे फरार झालेल्या भोंदू मांत्रिकांची नावे आहेत.

Woman Cheating By Mantrik In Pune
मांत्रिकाकडून महिलेची फसवणूक
author img

By

Published : Apr 8, 2023, 5:01 PM IST

ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कशेळी गावात असलेल्या सीजी पार्कच्या राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये ललिता हरिकेश उपाध्याय (४८) नावाची महिला राहते. त्यातच काही दिवसांपासून ललिता ह्यांना घरात काहीतरी विचित्र घडते असा समज झाला होता. याचाच फायदा घेऊन त्या महिलेला उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील रहिवासी असलेले भोंदू मांत्रिक छोटे लाल यादव, लालू यादव, हिरालाल यादव नावाच्या तिघांनी मिळून आधी ललिता यांना जादूटोणा तंत्रमंत्र विद्या करत असल्याची थाप मारून त्यांना विश्वासात घेतले.

घरात सुख आणि शांती आणू : त्यानंतर तिघाही भोंदूंनी त्या महिलेला सांगितले की, तुमच्या घरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. आम्ही सर्व ऋषी आणि मांत्रिक असल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सुख आणि शांती आणू. यासाठी पूजापाठ करण्याची गरज आहे. पण यासाठी पूजा तुमच्या घरीच करावी लागेल. त्यात भरपूर पूजेचे साहित्य लागेल. असे सांगून तिघांनी आपसात संगनमत करून महिलेकडून ५० हजार रुपये उकळले. मात्र ५० हजार रुपये घेऊन गेल्यानंतर तिन्ही भोंदू मांत्रिक घरात पूजापाठ करण्यासाठी आलेच नाही.

फरार भोंदू मांत्रिक आरोपींचा शोध सुरू : दुसरीकडे बरेच दिवस उलटूनही जेव्हा तिघेजण पूजापाठ करण्यासाठी घरी आले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर महिलेने नारपोली पोलीस ठाणे गाठून तिन्ही भामट्या मांत्रिकाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिन्ही फरार भोंदू मांत्रिक आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अदृष्य शक्तीचा धाक दाखवून लुबाडले : ठाणे येथे एका ७९ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला अदृश्य आत्म्याची भीती दाखवून तुमचा त्या आत्म्यामुळे मृत्यू होईल; त्यामुळे तुम्हाला तंत्रमंत्र, धार्मिक पूजापाठसह लोकांना जेवण घालण्यासाठी आणि इतर खर्च लागेल, अशी थाप देत या भोंदू मांत्रिक महिलेने त्या व्यक्तीला १५ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा गंडा घातल्याची घटना 15 सप्टेंबर, 2022 रोजी समोर आली होती. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीत घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका भोंदू मांत्रिक महिलेला अटक केली होती. मात्र तिची दुसरी साथीदार फरार असून पोलीस तिचा शोध घेत होते. प्रिया उर्फ त्रिशा कुणाल केळुसकर (वय २६, रा. खोणी गाव डोंबिवली ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव होते.

हेही वाचा: Shirdi Airport: साईभक्तांसाठी खुशखबर; शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगची सुविधा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.