ठाणे - लोकसभा निवडणूक बघता महाराष्ट्रात सेना-भाजपची युती झाली आहे. मात्र, इतर राज्यात सेना-भाजपची युती झालेली नाही. त्यामुळे सेनेने उत्तर प्रदेशात ५ जागांवर स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. या जागांसाठी त्यांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत.
यात श्रीमती आरती अग्रवाल - मेरठ, नागेंद्र चौधरी - गजियाबाद, डॉ. पुनम यादव - फरूकाबाद, कुमारी तुलसी चौधरी - बरेली, आनंद विक्रम सिंघ- कनौज, ही नावे शिवसेनेने जाहीर केली आहेत.
सेना-भाजप पक्ष श्रेष्ठींनी विचार करून इतर राज्यातदेखील एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढावी, अशी इच्छा शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक गुलाबाचंद दुबे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक गुलाबाचंद दुबे यांनी यापूर्वी जोनपूरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.