ETV Bharat / state

दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता पती; जन्मदिनीच पत्नीने जिवंत जाळला - marrying another

पती दुसरे लग्न करणार असल्याच्या संशयावरून पत्नीने वाढदिवसादिशीच पतीला जाळून मारले. या प्रकरणी खूनी पत्नीला पुण्याच्या ससून रूग्णालयातून ताब्यात घेतले आहे.

संदापित छायाचित्र
संदापित छायाचित्र
author img

By

Published : Jan 26, 2020, 8:35 PM IST

ठाणे - इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नौदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा १०० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ जानेवारी रोजी समोर आली होती. ही घटना बदलापूरातील हायप्रोफाईल समजल्या जाण्याऱ्या साई आर्केड इमारतीत घडली होती.

गुड्डूसिंग यादव (वय 52 वर्षे) असे मृत माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुनीता यादव (वय 38 वर्षे), असे आरोपी पत्नीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत पतीचे एका तरुणीशी प्रेम सबंध जुळून आल्याने ते दोघे लग्न करणार होते. याचा संशयातून आरोपी पत्नीने 5 जानेवारीला रात्रीच्या सुमारास झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर पती गाढ झोपल्याचे पाहून पत्नीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम भागातील खामकर विद्यालयाजवळ असलेल्या साई आर्केड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत गुड्डू सिंग यादव यांनी 2009 मध्ये हा फ्लॅट विकत घेतला होता. मृत यादव हे नौदलातून निवृत्त झाले होऊन ते दिल्ली येथे आयकर विभागात कार्यरत होते. या दरम्यान त्यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून ते दोघे लग्न करणार होते. या दोघांच्या लग्नाची माहिती आरोपी पत्नीला मिळाली होती. त्यामुळे आरोपी पत्नी सुनीता ही पतीला सोडून त्यांच्या दोन मुलासंह अलाहाबाद येथे राहत होती. त्यातच मृत यादव बदलापूरमधील फ्लॅट विकण्यासाठी 2 जानेवारीला ते आपल्या पत्नीसह बदलापूरला आले होते. 5 जानेवारीला मृत पतीचा वाढदिवसही होता. तर आरोपी पत्नीने आदीपासूनच घरात पेट्रोल आणून ठेवले होते. त्याच दिवशी आरोपी पत्नीने मृत गुड्डूसिंग यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यांनतर पती गाढ झोपेत असल्याचे पाहून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.

हेही वाचा - तिहेरी हत्याप्रकरणी आरोपी त्रिकुटाला जन्मठेपेची शिक्षा

मात्र, त्यावेळी मृत पतीला शरीर भाजल्याने जाग येताच त्यांनी आरोपी पत्नीच्या दोन्ही पायाला पकडून ठेवले. त्यामुळे तीचेही पाय 20 ते 25 टक्के भाजले होते. तरी देखील ती पतीच्या तावडीतून सुटून तिने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घराबाहेर पळ काढला. तर यांच्या घरातून धूर येवू लागल्याने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी या घटनेची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस व अग्निशामन विभागाला दिली होती.

त्यानंतर पोलीस निरीक्षक सारिपुत्र, सहायक पोलीस निरीक्षक चौगुले, पोलीस उपनिरीक्षक ए. आर. दोंदे, पोलीस नाईक विष्णु मिरकले, पोलीस हवालदार कुंभारे, पोलीस शिपाई गुरव आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी गुड्डूसिंग याच्या घरात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत त्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. चौकशीत गुड्डूसिंग याच्यासोबत त्याची पत्नी सुनीता ही देखील राहण्यासाठी आली होती. पण, घटना घडल्यापासून ती त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे पोलिसांना तिच्यावरच अधिक संशय येत होता. त्यामुळे त्यांनी तीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा - भिवंडीत अग्नी तांडव: भंगार गोदामाला भीषण आग

सर्वप्रथम बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तब्बल एक आठवडा पोलीस मृत गुड्डूसिंग यांची पत्नी सुनीता हिचा शोध घेत होती. त्यावेळी पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी बदलापूर पश्चिम पोलिसांना सुनीता गुड्डूसिंग यादव ही महिला पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला पुण्यावरून ताब्यात घेऊन बदलापुरात पोलिसांनी आणल्यानंतर तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गुड्डूसिंग यादव याच्या हत्येप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात सुनीता यादव विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर तिला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - ठाण्यात तीन हात नाका पुलावर अपघात; दोघे ठार

Intro:kit 319Body:दुसरे लग्न करण्याच्या संशयातून 'त्या' माजी नौदल अधिकारी पतीला जिवंत जाळून ठार मारल्याचे उघड

ठाणे : एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरीलफ्लॅटमध्ये नैदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याचा १०० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ जानेवारी रोजी समोर आली होती. हि घटना बदलापूरातील हायप्रोफाईल साई आर्केड इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली होती.
गुडूडूसिंग यादव (52) असे मृत माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. तर सुनीता यादव (38) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतक पतीचे एका तरुणीशी प्रेम सबंध जुळून आल्याने ते दोघे लग्न करणार होते. याचा संशयातून आरोपी पत्नीने ५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर पती गाढ झोपल्याचे पाहून पत्नीने त्यांच्या अंगावर पेट्रोल जाळून ठार मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बदलापूर पश्चिम भागातील खामकर विद्यालयाजवळ असलेल्या साई आर्केड या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मृत गुड्डू सिंग यादव यांनी २००९ मध्ये हा फ्लॅट विकत घेतला होता. मृत यादव हे नौदलातून निवृत्त झाले होऊन ते दिल्ली येथे आयकर विभागात कार्यरत होते. यादरम्यान त्यांचे एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून ते दोघे लग्न करणार होते. या दोघांच्या लग्नाची माहिती आरोपी पत्नीला मिळाली होती. त्यामुळे आरोपी पत्नी सुनीता ही त्यांच्या दोन मुलासंह अलाहाबाद येथे राहत होती. त्यातच मृत यादव बदलापूरमधील फ्लॅट विकण्यासाठी २ जानेवारी रोजी ते आपल्या पत्नीसह बदलापूरला आले होते. ५ जानेवारीला मृतक पतीचा वाढदिवसही होता. तर आरोपी पत्नीने आदीपासूनच घरात पेट्रोल आणून ठेवले होते. त्याच दिवशी आरोपी पत्नीने मृत गुड्डूसिंग यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यांनतर पती गाढ झोपेत असल्याचे पाहून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. मात्र त्यावेळी मृतक पतीला शरीर भाजल्याने जाग येताच त्यांनी आरोपी पत्नीच्या दोन्ही पायाला पकडून ठेवले. त्यामुळे तीचे पाय २० ते २५ टक्के भाजले होते. तरी देखील ती पतीच्या तावडीतून सुटून तिने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घराबाहेर पळ काढला. तर यांच्या घरातून धूर येवू लागल्याने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी या घटनेची खबर बदलापुर पश्चिम पोलिस व अग्निशामन विभागाला दिली होती. व.पो.नि. सारिपुत्र, स.पो.नि.चौगुले, पो.उप.नि. ए.आर.दोंदे, पा.ना.विष्णु मिरकले, पो.हवा.कुंभारे, पो.कॉ.गुरव आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी गुड्डूसिंग याच्या घरात मोठया प्रमाणात लागलेल्या आगीत त्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. चौकशीत गुड्डूसिंग याच्यासोबत त्याची पत्नी सौ.सुनीता ही देखील राहण्यासाठी आली होती. पण घटना घडल्यापासून ती त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे पोलिसांना तिच्यावरच अधिक संशय येत होता. त्यामुळे त्यांनी तीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.
सर्वप्रथम बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली होती. तब्बल एक आठवडा पोलिस मृत गुड्डूसिंग यांची पत्नी सुनीता हिचा शोध घेत असताना पुण्यातील बंड गार्डन पोलिसांनी बदलापुर पश्चिम पोलिसांना सुनीता गुड्डूसिंग यादव ही महिला पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल असल्याची माहिती देत तीने पती गुड्डूसिंग याच्यासोबत झालेल्या भांडणात तो रात्री झोपेत असतानाच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळून ठार मारल्यावर पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने प्रेत बेवारस स्थितीत त्याच घरात टाकून ती पळून गेली. त्यामध्ये तिचे पाय देखील त्या आगीत २० ते २५ टक्के भाजले होते. घटनेच्या मध्यरात्री निघून ती थेट पुण्यातील ससूण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी पुण्यावरून तिला ताब्यात घेऊन बदलापूरात पोलिसांनी आणल्यानंतर तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
गुड्डूसिंग यादव याच्या खुनाप्रकरणी बदलापुर पोलिस ठाण्यात सुनीता यादव हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पूर्ण उपचारानंतर तिला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Conclusion:mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.