ठाणे - प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून कारखान्यात घुसून एका ३६ वर्षीय विधवा महिलेवर तिच्या प्रियकराने कैचीने वार केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना उल्हासनगर मधील कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात असलेल्या रेडिमेड कपडे शिवण्याच्या कारखान्यात घडली आहे. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रियकरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. दयानंद फुगारे (वय,३६) असे आरोपीचे नाव आहे.
प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार; घटना सीसीटीव्हीत कैद ... - उल्हासनगर प्रेमसंबंध तोडल्याच्या वादातून विधवा महिलेवर हल्ला
पीडित विधवा उल्हासनगरमध्ये राहते. तर आरोपी दयानंद हा उल्हासनगर ४ नंबर मधील अशाळेपाडा भागात राहतो. आरोपी दयानंदचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून आरोपीशी पीडितेने प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतरही आरोपीने पीडितेला संबध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, पीडितेने त्याला नकार दिल्याने वाद झाला. याच वादातून पीडित महिला कारखान्यात मशीनवर गाऊन शिवत असतानाच, सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आरोपी दयानंद कारखान्यात घुसून कैचीने पीडितेच्या पाठीवर वार केले.