ठाणे - महानगरपालिका क्षेत्रामधील नौपाडा प्रभागामधील जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. कोव्हिड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
ठाणे शहरामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जांभळी नाका येथील होलसेल भाजीपाला मार्केट बंद करण्यात येत असून पालिकेच्या ९ प्रभागांमध्ये १७ ठिकाणी होलसेल मार्केट सुरू करण्यात येत आहे. सदर होलसेल मार्केटच्या परिसरातील किरकोळ व्यापारी यांनी त्या ठिकाणी जाऊन भाजीपाला खरेदी करावयाचा आहे. त्या परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना या मार्केटमध्ये जाता येणार नाही. या ठिकाणी होलसेल व्यापारी व त्यांचे कामगार व किरकोळ व्यापारी यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
दरम्यान, याठिकाणी होलसेल व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांनाच भाजीपाल्याची विक्री करावी अन्य कोणासही भाजीपाला विक्री करण्यात येणार नाही. तसे आढळल्यास होलसेल व्यापाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी नियंत्रक अधिकारी यांच्याकडून होलसेल व्यापाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
साकेत पोलीस मैदान, अनिल जाधव मैदान, वृंदावन शेवटचा बसस्टॉप, मुंब्रा प्रभागसमिती मध्ये बाहुबली मैदान, जैन मंदिर मुंब्रा पोलीस स्टेशन समोर, मित्तल मैदान, दिवा प्रभाग समितीमध्ये दिवा महोत्सव मैदान , दिवा आगासन रोड, छत्रपती क्रीडा मैदान ,बीसयूपी जवळ, पडले गाव, वागळे प्रभाग समिती रामनगर पाण्याच्या टाकीजवळील मैदानात केंद्र सुरू करण्यात आली आहेत.