ठाणे - शहरात रोज २० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी तर एकाच दिवसात तब्बल ३१ रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. अशात ठाणेकर मात्र अजूनही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे सर्रास उल्लंघन करत आहेत. आज तर नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेसमोरच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले.
लोकांची गैरसोय होऊ नये, याकरता ठाणे मनपाने अनेक छोटे छोटे भाजी मार्केट तयार केले आहेत. त्यानुसार ठाणे मनपा मुख्यालयासमोर एक भाजी मार्केट पालिकेतर्फे तयार करण्यात आले. इथे पालिकेने भाजी विक्रेत्यांकरता सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग करुन दिले. इतकच नाही तर प्रत्येक भाजी विक्रेत्यासमोर १ मीटर अंतर यानुसार ग्राहकांकरतादेखील मार्किंग करण्यात आल्या. मात्र, ठाणेकर हे सगळे नियम पायदळी तुडवत भाजी खरेदी करत आहेत, ही गंभीर बाब आहे.