ETV Bharat / state

Vijay Wadettiwar: मुख्यमंत्र्यांच्या गावातच मृत्यूचे तांडव; विजय वडेट्टीवार यांनी घेतली कळवा रुग्णालयाची झाडाझडती - कळवा रुग्णालयाची झाडाझडती

कळवा हॉस्पिटल, महापालिका प्रशासन यांच्या संगनमताने सुरू असलेला भ्रष्टाचार आणि गैरप्रकारामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष झाले आहे. रुग्णांना न्याय कसा मिळणार? असा रोखठोक सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी फिती बांधून कळवा रुग्णालयातील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Aug 17, 2023, 10:29 PM IST

ठाणे : कळवा रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी आज रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कळवा रुग्णालयातील प्रशासन आणि पालिका अधिकाऱ्याची चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच याप्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधिश यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून मृत्युंचा नातेवाईकांना दहा लाखांची मदत तातडीने जाहिर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

युवक काँग्रेसचे कळवा रुग्णालयाबाहेर मुक आंदोलन : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार कळवा रुग्णालयात येण्यापूर्वी युवक काँग्रेसच्या वतीने रुग्णालया बाहेरच मूक आंदोलन केले. या घटनेचा निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी फिती बांधून निषेध व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालयाच्या आवारात मुक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. वेळीच प्रशासनाला जाग यावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

रुग्णालयाला काय मदत केली? : मुख्यमंत्री एकीकडे ठाणेकरांना ग्लोबल हॉस्पिटलची स्वप्न दाखवत आहेत, मात्र कळवा हॉस्पिटलकडे पाहिल्यास ते ठाणेकर रुग्णांच्या आरोग्याशी खेळतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे आरोग्याच्या दृष्टीने मदत केल्याची यादी जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला काय मदत केली आणि कधी करणार असा प्रश्न विचारत, कळवा रुग्णालय हे राम भरोसे असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. तर सत्तेच्या साठमारीत राज्यातील लोकांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या रुग्णालयाकडे पाहिल्यास महापालिकेला वेळ नाही. तर यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मनोज शिंदे, जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण,प्रवक्ते सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

वडेट्टीवार यांनी केल्या खालील मागण्या : शहर सौंदरीकरणावर करोड्यांचा खर्च केला जातो. मात्र रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालय महापालिकेला चालवायला येत नसेल तर त्यांनी शासनाकडे द्यावे. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष मात्र राज्यात सत्तेची साठमारी सुरू, कळवा रुग्णालयाच्या डीनला कारभार झेपत नसल्याचे दिसत असून त्यांच्या जागी नवीन डीनची नियुक्ती करावी असेही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Vijay Wadettiwar On Amit Shah : अमित शाह ठासून खोटे बोलतात; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
  2. Vijay Wadettiwar News : मोदी सरकारला राहुल गांधी यांच्या रुपात धनाजी संताजी दिसू लागले - विजय वडेट्टीवार
  3. Vijay Wadettiwar on Ajit Pawar: अजित पवार-शरद पवारांच्या भेटीमागे पंतप्रधानांची 'ती' अट- विजय वडेट्टीवार यांचा दावा

माहिती देताना विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.