ETV Bharat / state

Viral Video : 51 वर्षीय रोमँटिक कपलचा सोशल मीडियावर धुमाकुळ - अमिताभ बच्चन

ठाण्यातील शैलेश आणि वंदना इनामदार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी १९७९ मध्ये रिलीज झालेल्या मंजिल सिनेमातील "रिमझिम गिरे सावन". गाण्यावर हुबेहूब नक्कल करीत व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांची पसंती मिळत आहे.

Shailesh and Vandana Inamdar
शैलेश आणि वंदना इनामदार
author img

By

Published : Jul 11, 2023, 10:47 PM IST

Updated : Jul 11, 2023, 11:00 PM IST

शैलेश आणि वंदना इनामदार यांची प्रतिक्रिया

ठाणे : आकाशातून कोसळणारा पाऊस आणि सिनेमातील काही गाणी यांचे एक अतूट नाते पाहायला मिळते. त्यातीलच एक गाणे म्हणजे १९७९ मध्ये रिलीज झालेल्या मंजिल सिनेमातील "रिमझिम गिरे सावन". त्याकाळी हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले. त्या गाण्याचे शब्द, संगीत, त्याबरोबरच अमिताभ बच्चन, मौसमी चॅटर्जी यांची जोडीची छाप आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. अमिताभ बच्चन, मौसमी चॅटर्जी यांची एका जोडप्याने तशीच हुबेहूब नक्कल करून त्याचा व्हिडिओ बनवला आहे. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओला लाखो लोकांची पसंती : ठाण्यातील 51 वर्षीय शैलेश इनामदार आणि 47 वर्षीय वंदना इनामदार या जोडप्याने मूळ गाण्याचा सखोल अभ्यास करून केवळ आवड म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. अमिताभ आणि मौशमी यांनी ज्याप्रमाणे पावसात चालत गाणे रेकॉर्ड केले, अगदी त्याच पद्धतीने इनामदार दाम्पत्याने या गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे. इनामदार दाम्पत्याचे गाणे एवढे हुबेहूब बनले आहे की, अनेकांना दोन्ही गाण्यातील फरक करणे मुश्किल होत आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर लाखो लोकांनी त्याला पाहिले आहे. एवढा प्रतिसाद व्हिडीओला मिळेल याची कल्पना देखील केली नसल्याचे इनामदार यांनी सांगितले. केवळ नातेवाईक आणि मित्र परिवारासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. परंतु त्याला एवढ्या लाईक्स मिळतील यावर विश्वास बसत नसल्याचे इनामदार म्हणाले. सदर व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून सर्वांनीच पसंत गाण्याला प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.

आजही जुन्या गाण्यांना मिळते मोठी पसंती : भारतातील सर्व जुनी गाणी आजही लोकप्रिय आहेत. हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. इनामदार यांनी तयार केलेल्या गाण्यामुळे आजही अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या. आजही जुन्या गाण्यांची क्रेझ अजिबात कमी होत नाही. त्यामुळेच ही जोडी सध्या चर्चेत आली आहे. आजही मनाला प्रफुल्लित करण्यासाठी आणि जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी जुनी गाण्याचा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

Last Updated : Jul 11, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.