ETV Bharat / state

४ थ्या मजल्यावर अडकलेल्या मांजराच्या पिल्लाची थरारकरित्या सुटका

चौथ्या मजल्यावर अडकून पडलेल्या मांजरीच्या पिल्लाची उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी थरारकरित्या सुटका केली. ही घटना उल्हासनगर कॅम्प १, बेवष चौकातील संत पहुरा अपार्टमेंटमध्ये घडली.

author img

By

Published : Jan 23, 2021, 9:01 PM IST

Updated : Jan 23, 2021, 10:11 PM IST

Cat puppy saved Ulhasnagar
संत पहुरा अपार्टमेंट मांजर सुटका

ठाणे - चौथ्या मजल्यावर अडकून पडलेल्या मांजरीच्या पिल्लाची उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी थरारकरित्या सुटका केली. ही घटना उल्हासनगर कॅम्प १, बेवष चौकातील संत पहुरा अपार्टमेंटमध्ये घडली. फायरमनच्या जिगरबाजीमुळे मांजरीच्या पिल्लाला सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आले.

माहिती देताना अग्निशमन दल प्रमुख बाळू नेटके

ग्रील तोडून खाली उतरवण्याचा निर्णय...

५ मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाकडून पाळीव मांजरीचा सांभाळ केला जातो. आज अचानक दुपारच्या सुमाराला मांजरीचे पिल्लू खिडकीच्या लोखंडी ग्रीलमधून इमारतीच्या बाहेरच्या सज्जावर जाऊन बसले. मात्र, काही केल्या या पिल्लाला आत येता येत नव्हते. त्यामुळे, सोसायटीमधील नागरिकांनी उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती कळवली.

हेही वाचा - ठाण्यात वृक्ष लागवड आणि संगोपन करत अनोखा बालिका दिन साजरा

अग्निशमन दलाचे प्रमुख बाळासाहेब नेटके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून फायरमन रोशन आगाज यांनी ग्रील तोडून गच्चीवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या टीमने इमारतीच्या खाली नागरिकांच्या मदतीने जंपिंग सीट पकडली. फायरमन रोशन आगाज यांनी यशस्वीरित्या मांजरीच्या पिल्लाची सुटका करत तिला सोसायटीच्या नागरिकांना सुपूर्द केले. तर, मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका होताच सोसायटीच्या बच्चेकंपनीने जल्लोष केला. तर, नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.

हेही वाचा - गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती

Last Updated : Jan 23, 2021, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.