ठाणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर यास ठाणे तुरुंगातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज (शुक्रवार) भिवंडी येथील कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. ठाणे जेल मधून एनसीबीचे अधिकारी हे त्याला घेवून निघाले आहेत. १ पोलीस व्हॅन, १ एम्बयुलन्स आणि दोन पोलीस जीप अशा ताफ्यातून त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती एनसीबीअधिकाऱ्यांची दिली आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त -
कुख्यात गुंड इकबाल कासकर यास भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा
हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक