ETV Bharat / state

थाप मारुन सुरक्षारक्षाकच्या खिशावर भामट्यांनी मारला डल्ला

रिक्षामध्ये बसलेल्या एका सुरक्षा रक्षकाला दोन भामट्यांनी तुम्ही गुटखा खाऊन रस्त्यावर का थुंकता ? असे सांगून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या खिशातून हातचलाकीने हजारो रुपयांची रोख लंपास केल्याची घटना घडली आहे.

author img

By

Published : Dec 24, 2020, 10:17 PM IST

उल्हासनगर
उल्हासनगर

ठाणे - रिक्षामध्ये बसलेल्या एका सुरक्षा रक्षकाला दोन भामट्यांनी तुम्ही गुटखा खाऊन रस्त्यावर का थुंकता ? असे सांगून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या खिशातून हातचलाकीने हजारो रुपयांची रोख लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्या दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शशिकांत उपासनी (वय 65 वर्षे), असे रक्कम लंपास झालेल्या सुरक्षा रक्षकचे नाव आहे.

रिक्षातील प्रवास पडला 30 हजार रुपयाला

उल्हासनगरमधील एका बँकेत सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेले शशिकांत उपासनी हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते शिवाजी चौक येथून कल्याण-अंबरनाथ रस्त्याने प्रवाशी रिक्षातून जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत रिक्षामध्ये बसेलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी शशिकांत यांना तुम्ही गुटखा खाऊन रस्त्यावर का थुंकता, असे सांगून त्याच्या खिशाची झडती घेण्याचा बहाणा केला. त्यांनतर हातचलाकीने हातोहात या भामट्यांनी त्याच्या खिशातील 30 हजारांची रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठण्यात दोन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ठाणे : विवाहसोहळ्यातून चोरी गेलेले सोने पोलिसांनी मध्यप्रदेशमधून केले हस्तगत

हेही वाचा - ख्रिसमसच्या हटके शुभेच्छा! पाहा शुभेच्छा देणारी हेअरस्टाईल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.