ठाणे : तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पडललेल्या खड्यामुळे कल्याण डोंबिवली शहरात ५ जणांचा खड्याने बळी घेतला होता. त्यावेळी महापालिका प्रशासनावर सर्वच स्तरातून सडकून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्याची दुरुस्ती केली होती. आता मात्र पुन्हा शहरात खड्ड्याने डोकेवर काढल्याचे दिसून येत असतानाच रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याचा अंदाज न आल्याने दोन वयोवृद्ध व्यक्ती पडून गंभीर जखमी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली. रवींद्र उपेंद्र पै (५८), गणेश सहस्त्रबुध्दे (७१) अशी खड्ड्यात पडून गंभीर दुखापती झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची नावे आहेत.
कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्यात पडून दोन वयोवृद्ध गंभीर जखमी
कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी हे गणेश सहस्त्रबुद्धे हे काल सकाळी दुकानात दुध आणण्यासाठी गेले असता ते सुद्धा टिळक चौकातील खड्डय़ात पडून जखमी झाले आहे. त्यांच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावरही देखील खाजगी रुग्णलायत उपचार सुरू आहेत.