ETV Bharat / state

मोबाईल फोडल्याचा आरोप, तरुणाला लुटणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना अटक - मध्यवर्ती पोलीस ठाणे

मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने तरुणाला लुटणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींसमवेत पोलीस
author img

By

Published : Jun 4, 2019, 9:41 AM IST

ठाणे - मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने तरुणाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. करण रामलाल यादव (२२) अनिल नामदेव भोईटे (३७) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात राहणारे आहेत. हे २ आरोपी बँक समोर उभे राहून व्यक्तीला हेरून मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने अनेकांना लुटत होते.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस

हेमलाला बुढा (२४) हे उल्हासनगर मधील एका कंपनीत सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. ३ दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे ते उल्हासनगर ३ नंबर परिसरातील इंडियन बँकेत दुपारच्या सुमाराला कंपनीची ८० हजार रुपयाची रक्कम काढण्यासाठी आले होते. ते बँकेतून बाहेर आल्यानंतर एका आरोपीने रिक्षातून उतरताना हेमलाला यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर आरोपीने हातातील मोबाईल जमिनीवर आपटून त्यांच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप केला. तसेच माझा मोबाईल तुझ्यामुळे फुटला त्याला दुरूस्ती करून दे, असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. आरोपीने त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून सपना गार्डनकडे निर्जनस्थळी घेवून गेले. त्यानंतर त्याच्याकडील ८० हजार रुपयांची रक्कम काढून घेत हेमलालाला रिक्षातून उतरून दोघेही आरोपी फरार झाले.

हेमलाला यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरण करून ८० हजार रुपये लुटल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना काटेमानवली परिसरातून सापळा रुचून अटक केली. या २ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

मोबाईल फोडल्याच्या बहाण्याने तरुणाला लुटणाऱ्या सराईत दुकलीला बेड्या

ठाणे :- तरुणाला जाणूनबुजून धक्का मारत हातातील मोबाईल जमिनीवर आपटून फुटल्याचा आरोप करीत आता माझा मोबाईल दुरूस्ती करू दे, असा वाद घालून तरुणाकडून ८० हजार रुपये घेवून फरार झालेल्या सराईत  दुकलीचा शोध घेवून मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

विशेष म्हणजे अटकेत असलेले दोघेही भामटे  बेंक समोर उभे राहून एकाद्या व्यक्तीला हेरून मोबाईल फोडल्याच्या बाहाण्याने अनेकांना लुटल्याचे पोलीस तपासात निष्पन झाले आहे. करण रामलाल यादव (२२) अनिल नामदेव भोईटे (३७) असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या भामट्यांची नावे असून दोघेही कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात राहणारे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हेमलाला बुढा (२४) हे उल्हासनगर मधील एका कंपनीत सुपरवायझर पदावर कार्यरत आहेत. तीन दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे हेमलाला हे उल्हासनगर ३ नंबर परिसरातील इंडियन बेंकेत दुपारच्या सुमाराला कंपनीची ८० हजार रुपयाची रक्कम काढण्यासाठी आले होते. त्यावेळी बेंके बाहेर पाडत ठेवून दोघे ठकसेन एका रिक्षात बसले होते. हेमलाला हे रक्कम काढून बेंके बाहेर आले असता दोघा आरोपीपैकी एकाने रिक्षातून उतरताना हेमलाला यांना जोरदार धडक दिली. आणि हातातील मोबाईल जमिनीवर आपटून फोडल्याचा आरोप त्याने हेमलालावर करीत आता माझा मोबाईल तुझ्यामुळे फुटला त्याला दुरूस्ती करून दे, असे म्हणत त्याच्याशी वाद घातला. आणि जबरदस्तीने रिक्षात बसून त्याला सपना गार्डनकडे निर्जनस्थळी घेवून गेले. त्यानंतर त्याच्याकडील ८० हजार रुपयांची रक्कम काढून घेत हेमलालाला रिक्षातून उतरून दोघेही ठकसेन फरार झाले.

दरम्यान, हेमलाल यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरण करून ८० हजार रुपये लुटल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरु केला असता दोन्ही आरोपी सराईत गुन्हे असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना काटेमानवली परिसरातून सापळा रुचून अटक केली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.  

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.