ठाणे : कळव्यातील तरुणाच्या हत्याप्रकरणी दोघांना अटक - ठाणे कळवा हत्या
मृतक सुनील सोनावणे याने दोघे अनोळखी जोडप्याने घरी जा इथे का बसलास असे हटकले. याचा राग आरोपी पटवा आणि शहा याना आला. त्यामुळे सुनील सोनावणे आणि आरोपींमध्ये शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. अखेर दोघांनी मृतक सुनील याच्यावर चाकूचे वार केले आणि पळून गेले. जखमी सुनीलला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सुनील याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास कळवा पोलीस करत आहे.
ठाणे - रात्री उशिरा कळव्याच्या मफतलाल कंपनीच्या परिसरात बसलेल्या दोन अनोळखी जोडप्याना 'रात्र झाली इथे बसू नका घरी जा', असा सल्ला देणाऱ्या सुनील सुभाष सोनावणे या तरुणाची हत्या करून पसार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शोधून काढले. विक्रम किमतीलाल पटवा आणि मोहम्मद उस्मान अतिउल्ला रहमान शहा यांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे.
आरोपी विक्रम किमतीलाल पटवा (वय २४ रा. भास्कर नगर कळवा), मोहम्मद उस्मान अतिउल्ला रहमान शहा (वय २५, रा. भास्कर नगर कळवा पूर्व) यांना अटक करण्यात आली. हे दोघे फातिमा नासिर खान आणि शबनम नासिर खान यांच्यासोबत २० मे रोजी मफतलाल कंपनी येथील जागेत बसले होते. दरम्यान मृतक याच ठिकाणी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान मृतक सुनील सोनावणे याने दोघे अनोळखी जोडप्याने घरी जा इथे का बसलास असे हटकले. याचा राग आरोपी पटवा आणि शहा याना आला. त्यामुळे सुनील सोनावणे आणि आरोपींमध्ये शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. अखेर दोघांनी मृतक सुनील याच्यावर चाकूचे वार केले आणि पळून गेले. जखमी सुनीलला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सुनील याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास कळवा पोलीस करत आहे.