ठाणे - दूध आणण्यासाठी दुकानावर जात असलेल्या आठ वर्षीय चिमुरडीला अपहरण करण्याच्या उद्देशानने निर्जन स्थळी घेऊन जाणाऱ्या नराधमाला पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या मित्राच्या मदतीने त्याला पकडले आणि अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा - धर्मेंद्र अन् लिना चंदावरकर यांच्यासोबत केलेल्या लिपलॉकमुळे चर्चेत आले होते राम जेठमलानी
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षीय चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दूध आणण्यासाठी ती ओडन्स मार्केटमध्ये जात होती. त्यावेळी हा नराधम अंधाराचा फायदा घेत तिच्यावर पाळत ठेवून होता. यावेळी अपहरण करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीचे डोक्याचे केस पकडून तिला निर्जन स्थळी घेऊन जात होता. यावेळी पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केला असता तिचा आवाज ऐकून तिच्या घरचे धावत आले.
हेही वाचा - B'Day Spl: 'या' कारणामुळे आशा भोसले अन् लता मंगेशकर यांच्यात आला होता दुरावा
तिच्या वडिलांनी आपल्या मित्राच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या नराधमाला जागीच पकडले आणि आपल्या मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. यानंतर चिमुरडीच्या वडिलांनी नराधमाला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अंबरनाथ पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिंटू जाधव (वय 30) असे या नराधमाचे नाव आहे. हा नराधम अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.