ठाणे - रेशनिंगचे गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रक मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये तब्बल ८.५ टनहून अधिक गहू, तांदळाच्या गोण्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस नाकाबंदीवर असताना एक ट्रक मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होता. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात गव्हर्नमेंट ऑफ पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा व एक कदम स्वच्छता की ओर, असे शिक्के असलेल्या गहू व तांदळ्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी तपासणी केली असता चालक विना परवाना वाहतूक करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन १७ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा - रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई सुरू, पालिका प्रशासनासह वाहतूक विभागाची संयुक्त कारवाई