ठाणे : शेकडो वर्षांच्या आदिवासी संस्कृतीचा वसा जपणारे आदिम विवाह सोहळ्यास सद्याच्या आधुनिक युगातही आदिवसी तरुण आपल्या विवाह सोहळ्यास पसंती देत आहेत. विशेष म्हणजे या आदिवासी बांधवांच्या आदिम विवाह सोहळ्यात धरतीमातेसह सूर्य, चंद्र, डोंगर, पशू पक्षी यांच्या प्रतीकृतीचे आणि वृक्षाचे पुजन करून क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले जाते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदिवासी वर-वधूचे आदिम विवाह सोहळा पार पडत आहे. त्यामुळे निसर्ग पुजक लग्न सोहळे प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे अशा भावना आदिवासी तरुणांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
संस्कृतीविषयी जगजागृती आवश्यक : ठाणे आणि पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठाणे, पालघर जिल्ह्यांशिवाय नगर आणि नाशिक जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या ग्रामीण भागात 1 कोटींच्या जवळपास आदिवसी समाजाची लोकसंख्या आहे. यामधील शहरी भागात राहण्यास गेलेल्या आदिवासी बांधवांना त्यांची संस्कृती आणि परंपराविषयी जनजागृती करणे आजच्या काळात गरजेचे असल्याचे, मत आदिवासी संघटनेच्या पदाधिकऱ्याने व्यक्त केले. शेकडो वर्षांपासून आदिवासी समाजाची आगळीवेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षात आदिवासी समाज डोंगरदऱ्यात राहून पदवीपर्यत शिक्षण घेऊन त्या समाजातील तरुण तरुणी शासकीय कार्यलयात अथवा खासगी किंवा उद्योजक म्हणून शहरी भागात राहत आहेत. अशा तरुणांमधील आदिवासी संस्कृती आणि परंपरा लोप पावत चालल्याने विविध आदिवासी संघटना संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पुढे येऊन समाजात जनजागृती करीत आहेत.
आदिवासी परंपरेनुसार पार पडला विवाह सोहळा : आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी क्रांतिकारक महापुरुषांचे विचार आणि त्यांची ओळख समाजाला व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ठाणे जिल्ह्यातील वेशीवर असलेल्या पालघरमधील कोचाळे येथील मिलिंद पांडुरंग बदादे व अस्मिता काशिनाथ गारे यांचा विवाह सोहळा आदिवासी परंपरेनुसार नुकताच पार पडला. या विवाहाची सुरुवात धरतीमातेसह सूर्य, चंद्र, डोंगर, पशू पक्षी यांच्या प्रतीकृतीचे व वृक्षाचे पुजन करून आदिवासी समाजाची झटलेल्या क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन करुन हा विवाह सोहळा पार पडला.
काय या लग्नाचे वैशिष्ट्ये : आदिवासी विवाह सोहळ्यात मंगलाष्टगाथा म्हणण्याऐवजी पुष्पांजली बोलून विवाह सोहळा पार पाडला जातो. पुष्पांजलीमध्ये अक्षदा (तांदूळ) म्हणून फुलांचा वर-वधुवर वर्षाव करून त्यांना आशीर्वाद दिले जातात. आदिवसी समाज निर्सगाचे रक्षण करत असतो. या विवाह विधीमुळे निर्सगाच्या रक्षण होते आणि धन्याची नासाडीही होत नसल्याचे यजमान सांगतात. अशा विवाह सोहळ्यात आदिवासींचे संविधानाक अधिकार व पेशा अॅक्ट १९९६ हे पुस्तके विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना भेट म्हणून दिली जातात. आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा निसर्ग पुजक असून आदिवासी संस्कृती टिकवणे ही प्रत्येक आदिवासी बांधवांची जबाबदारी असल्याच्या उद्देशाने त्याची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जुन्या आदिवासी संस्कृतीला आधुनितेची जोड दिली : सोहळ्याचे आयोजक निरगुडे सांगता, विवाह सोहळ्याची परंपरा जुनीच होती. परंतु आधुनिकतेच्या नावाखाली आदिवासी संस्कृती लोभ पावत चालली आहे. यामुळे आदिवासी बांधव समाजापासून दुरावत आहे. त्यामुळे जुन्या आदिवासी संस्कृतीला आधुनितेची जोड देत प्रत्येक कार्यक्रमातून प्रत्येक आमच्या समारंभातून संस्कृती पूजेत म्हणजे निसर्ग पूजक असल्यामुळे आम्ही निसर्गाचे पर्यावरणही टिकवण्यासाठी त्या माध्यमातून आम्ही पावले उचलत आहोत. ही आदिम पद्धती आम्हाला पुढे जगण्यासाठी प्रवृत्त करेल, पुढील पिढ्या टिकवण्याचे काम करेल म्हणून आम्ही आमची जुनी पद्धती आम्ही आता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत, ती काळाची गरज आहे म्हणून आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत असल्याचे निरगुडे म्हणाले.
नवरदेव मिलिंद बदादे काय म्हणाले : मी समाजाला माझ्या आदिम लग्न समारंभाच्या माध्यमातून समाजाला संदेश देत आहे. आपण सर्वांनी आपले संस्कृती टिकवली पाहिजे, आता आमच्या गावात बघाल तर बहुतेक आमचे समाज बांधव हे शहराकडे वळले आहेत. यामुळे आदिवासी संस्कृती विसरत चालला आहे. त्यामुळे हा एक प्रयत्न केला आहे. आपण पैसा खर्च न करता आपण समाजाला काय देऊ शकतो, आपल्या लग्नाच्या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपण त्याच्यामुळे मी पेशा आणि संविधानिक अधिकार आदिवासींचे पुस्तकाचे लग्नात वाटप केले. आदिवासी युवा फाउंडेशन आणि आदिवासी हक्क संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली, असे विवाह सोहळे पार पडत असल्याचे नवरदेवाने सांगितले.
हेही वाचा -