ठाणे - फाल्गुन महिन्यात येणाराहोळीचा सण म्हणजे उत्साह आणि जल्लोषाची पर्वणी. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात 'शिमगा' म्हणजेच 'होळी' हा सण साजरा करण्याची पारंपारिक प्रथा चालत आली आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील चेंदनी कोळीवाडा येथे 'एक गाव एक होळी' ही प्रथा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पूर्वसंध्येला चेंदणी कोळीवाडा येथे कोळी बांधवानी कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र येवून पारंपारिक पद्धतीने शिमगा म्हणजेच होळीचा सण साजरा केला. यावेळी कोळी समाजाच्या महिला आणि पुरुषांनी पारंपारिक वेशभूषा करत होळी भोवती फेर धरल्याने होळीचा उत्साह द्विगुणित झाला होता.
'आमच्या दाराशी हाय शिमगा,''सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा' अशा गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी नृत्य केले.तसेच, उत्सवात तरुण-तरुणींसह ज्येष्ठांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.