ठाणे - कार डेकोर व्यवसाय असलेल्या मनसुख हिरेन यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. जैन समाजातदेखील त्यांना मोठा मान दिला जात होता. याचा प्रत्यय आज ठाण्यात आला. हिरेन यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत त्यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा - राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
आज दुपारी मनसुख यांच्या घराजवळील जैन समाजाच्या सभागृहात मनसुख हिरेन यांची शोकसभा आयजित करण्यात आली होती. यात हजारो लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
ठाण्यात मिळाला अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह
ठाण्यात 5 मार्चला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीमला रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाला होता. गाळात रुतलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला. 4 मार्चपासून हिरेन हे घरात नव्हते. त्यानंतर मृतदेह मिळाल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. त्यांच्या मृत्यूमागे काय कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला; तपास 'एटीएस'कडे