ETV Bharat / state

Exclusive : धबधब्यावरून कोसळलेल्या आयटी इंजिनियरच्या शोधासाठी 'ड्रोन'ची मदत; ७ दिवसांनी मृतदेह लागला हाती - Thane News

हैद्राबाद येथून आलेल्या एका आयटी इंजिनियर तरुणाचा काळू धबधब्यात (kalu waterfall) पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल सात दिवसानंतर तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह शोधासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली.

kalu waterfall
काळू धबधब्यात तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 21, 2023, 8:21 PM IST

Updated : Aug 21, 2023, 9:19 PM IST

काळू धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

ठाणे : हैद्राबादहून तीन मित्र सहलीसाठी संह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत असलेल्या काळू धबधब्यावर आले होते. याचवेळी तोल जाऊ कोसळलेल्या आयटी इंजिनियरचा शोधासाठी ड्रोनसह रेस्क्यू टीमने सलग शोध मोहीम राबवून इंजिनियरचा मृतदेह धबधब्याच्या कुंडातील कपारीतून बाहेर काढला. अभिषेक रावलकर ( वय २९, रा.हैद्राबाद) असे मृत इंजिनियरचे नाव आहे. याप्रकरणी मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हैद्राबाद शहरात होता इंजिनियर : रेस्क्यू टीममध्ये ड्रोन चालक प्रशांत घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अभिषेक हा हैद्राबाद शहरात आई वडील, आणि एक भाऊ यांच्यासह राहत होता. घराचा कर्ता पुरुष म्हणून तो हैद्राबादच्या एका आयटी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. त्याला १ लाख २५ हजार रुपये वेतन मिळत होते. त्याच्याच वेतनावर कुटुंबाची उपजीविका सुरु होती. त्यातच त्याला कंपनीमधून आठ दिवसाची सुट्टी मिळाल्याने, तीन इंजिनिअर मित्रांसह सहलीला जाण्याचे ठरवले होते. सुरुवातीला तो मित्रासह पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरात निर्सगाच्या सानिध्यात सहल केल्यानंतर, १३ ऑगस्ट रोजी आणखी काही जवळचे पर्यटनस्थळ आहे का? याचा शोध गुगलवर सर्च करून पहिले. त्यांला ठाणे जिल्ह्यातील संह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत असलेल्या बाराशे फूट उंचावरून कोसळणारा, पाच टप्प्यात असलेला काळू धबधबा दिसला.

तोल जाऊन धबधब्यात कोसळला : सर्व मित्र भीमाशंकरहून काळू धबधबा येथे १३ ऑगस्टला दुपारी पोह्चल्यानंतर त्यांनी धबधब्याच्या वरच्या टप्पात जाण्याचा प्रयत्न केला. ५० ते ६० फूट वर आल्यानंतर चौघांपैकी एका मित्राचा तोल जाऊन तो धबधब्यात कोसळला. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याला पोहता येत असल्याने तो दगडाला पकडून वर आला. मात्र त्यानंतर काही वेळात अभिषेकचाही घसरून तोल गेला. तो धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला. विशेष म्हणजे त्याला पोहता येत नव्हते. तसा पाऊसही मुसळधार कोसळत होता. त्यामुळे काही क्षणातच तो पाण्यात वाहून गेला.

ड्रोन कॅमेराची घेतली मदत : या घटनेची माहिती महाराष्ट्र रेस्क्यु कॉर्डिनेशन ग्रुपवर मॅसेज आल्याने समजली. या ठिकाणी ग्रुपमधील दीपक विशे जवळ असल्याने, त्यांना या तरुणांना मदत तसेच शोधकार्य करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलिस स्टेशन, फॉरेस्ट ऑफिस, तहसीलदार ऑफिस यांना दिली. ते त्यांची टीम घेऊन मदतीसाठी रवाना झाले. पण उशीर झाल्यामुळे रविवारी त्यांची टीम शोध कार्य करू शकली नाही. सोमवार १४ ऑगस्ट रोजी या ठिकाणी त्यांच्या टीमकडून काळू नदी पात्रात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सलग तीन दिवस सुरू असतानाच शोध मोहिमेसाठी ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात आली.

ड्रोन कॅमेरामध्ये अभिषेकचा मृतदेह : घटनेची माहिती अनिल घरत यांना मिळताच त्यांनी अभिषेकच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिली. सानप यांच्या रायगड रेस्कू टीम सोबत संपर्क साधला. त्यानंतर रायगड रेस्क्यू टीम ही १९ ऑगस्ट रोजी घटनास्थळी दाखल झाली. सकाळी काळू धबधब्याच्या जवळच दोन्ही टीममधील २५ सदस्यांनी पुन्हा शोध घेत असताना, ड्रोन कॅमेरामध्ये अभिषेकचा मृतदेह आढळून आला. मात्र या ठिकाणी पाण्याचा तसेच हवेचा खूप मोठा प्रवाह होता. त्यामुळे मृतदेह कपारीमध्ये अडकलेला असल्याने, बाहेर येत नव्हता. तेव्हा एका बाजूने घरत व त्यांचे सहकारी स्वतः नदीच्या प्रवाहात उतरले, दुसरीकडुन दीपक विशे स्वतः रोपच्या सहाय्याने खाली उतरले व एका बाजूने रायगड आपत्ती व्यवस्थापन टीम यांच्या सहाय्याने अँकर हुक टाकून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र सात दिवस पाण्यात मृतदेह राहिल्याने दुर्गंधी सुटली होती. अश्यातच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. मात्र मृतदेह पूर्णपणे डी कंम्पोज झल्याने, अभिषेकच्या कुटूंबाने अंत्यविधी उल्हानसागर मधील एका स्मशानभूमीत केला.

माणुसकीच्या दृष्टीने यांनी केली मदत : या मोहिमेत सानप त्यांची रायगड रेस्क्यू टीम, प्रशांत घरत, कुसुम विशे, कमलू पोकला, भास्कर मेंगाळ, शांताराम बाम्हणे व त्यांचे सहकारी टीम, स्वामी, जयवंत खंडागळे, जोंटी बोराडे, महेश फोडसे, भास्कर घरत, प्रतीक बांगर, यज्ञेश बांगर, थितबी व सावर्णे गावातील गावकऱ्यांनी पार पडली. मात्र अभिषेकचा शोध घेण्यासाठी स्थानिक शासन स्थरावरून कोठलीही मदत नसताना सर्वांनी माणुसकीच्या दृष्टीने मदत केली. आता यापुढे तरी अश्या घटना घडल्या तर आवश्यक यंत्र सामुग्री तालुका स्तरावरच उपलब्ध व्हावी. अशी मागणी घरत यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Youth Fall In Kund While Taking Selfie: सेल्फी घेताना तरुण 70 फूट कुंडात कोसळला, बचाव कार्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल
  2. Coutralam Falls जुन्या कुरळा धबधब्यात वाहून गेलेल्या मुलाला तरुणाने वाचवले पहा व्हिडिओ
  3. सातार्‍यातील तरुण केळवली धबधब्यात बुडाला, रेस्क्यू टीमकडून शोध सुरू

Last Updated : Aug 21, 2023, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.