नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे तोंडली व मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. मेथी कोथिंबीर टोमॅटो लिंबू या भाज्यांचे दर कमी झाले आहेत तर इतर भाज्यांचे दर स्थिर (Vegetables Rate Today) आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३५०० रुपये ते ४००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, गवार प्रति १००किलोप्रमाणे रुपये ६००० ते ८०००रुपये,घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ३९०० ते ४८०० रुपयेकाकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये दर (vegetables Rate Today in APMC Market) आहेत.
पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ८५०० रुपये ते १०००० रुपये. शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे ५२०० रुपये ते ६५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४२०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये दर आहेत.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५००रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये, १००० रुपयेपुदिना नाशिक प्रति १०० जुड्या४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ३५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये दर आहेत.