नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी परिसरात किरकोळ वादातून वैश्य कुटुंबातील दोन भाऊ व एका बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण...
नवी मुंबई दोन कुटुंबांमधील वादाचे रूपांतर एक भ्याड हल्ल्यात झाले आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात तीन भावंडांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे
छेड काढल्याची तक्रार केल्याने हल्ला...
वैश्य कुटुंबातील मुलगी काजल हिची छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केला. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर इतर चार जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. याविषयी कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तर पोलिसांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा
अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला