ETV Bharat / state

खारघर मोबाईल शॉप चोरी प्रकरण; ४५ लाखांच्या मुद्देमालासह चोरटे गजाआड - पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह

तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. खारघरमध्ये चोरी करण्याच्या दिवशी तिघांनी कुर्ला येथून एक कार चोरली होती. याच कारमधून गॅसकटर घेऊन ते खारघर येथे आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.

४५ लाखांचा मुद्देमाल
४५ लाखांचा मुद्देमाल
author img

By

Published : Sep 9, 2020, 5:15 PM IST

नवी मुंबई- खारघरमध्ये मोबाईल शॉप फोडून चोरी करणाऱ्या ३ चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचे मोबाईल परराज्यात मागणीनुसार पाठवले जाणार होते.

माहिती देताना पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह

३० ऑगस्टला खारघर येथे मोबाईल शॉप फोडल्याचा गुन्हा घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकानात चोरटे शिरले होते व दुकान लुटण्यात आले होते. चोरीत ५० लाखाच्या जवळपास किमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. एवढेच नव्हे तर, दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरण्यात आला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले होते. तरीही खारघर पोलीस व गुन्हे शाखा पोलीस तपास करत होते. या प्रकरणी गुन्हे शाखा प्रभारी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, निलेश तांबे, संजय पवार, आदींचे पथक तयार करण्यात आले. तपासात काही संशयितांची नावे समोर आली. त्याआधारे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (वय २४), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (वय २८) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (वय २५) यांना अटक करण्यात आले.

तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे चोरीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. खारघरमध्ये चोरी करण्याच्या दिवशी तिघांनी कुर्ला येथून एक कार चोरली होती. याच कारमधून गॅसकटर घेऊन ते खारघर येथे आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली. या टोळीचे राज्याबाहेर चोरीचे मोबाईल खरेदी करणाऱ्यांसोबत संपर्क आहेत. त्यांना ज्या प्रकारचे मोबाईल अथवा टॅबची मागणी असेल, त्यानुसार चोरटे दुकान फोडून चोरी करायचे. या गुन्ह्यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा- कोरोना रुग्ण वाढीला इमारतींमधील नागरिक जबाबदार, कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अजब दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.