ETV Bharat / state

डोंबिवलीत अवतरले जाडजूड माकड; बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ - ठाणे NEWS

एमआयडीसीच्या निवासी क्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास जाडजूड माकड आढळून आले. यामुळे बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. या माकडाला परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. इमारतीच्या गच्चीवर पक्षी पाहण्याची सवय असलेल्या डोंबिवलीकरांना माकडही सहजतेने नजरेस पडत आहे.

डोंबिवलीत अवतरले जाडजूड माकड
author img

By

Published : Nov 6, 2019, 4:08 AM IST

ठाणे- भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या डोंबिवलीकरांना यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी माकडांचे दर्शन झाले होते. आता एमआयडीसीच्या निवासी क्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास जाडजूड माकड आढळून आले. यामुळे बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. या माकडाला परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. इमारतीच्या गच्चीवर पक्षी पाहण्याची सवय असलेल्या डोंबिवलीकरांना माकडही सहजतेने नजरेस पडत आहे.

काही महिन्यांपूर्वी फडके रोडसह एमआयडीसी भागामध्ये आढळलेल्या माकडांना नागरिकांकडून खाद्य पुरवण्यात आले. मात्र, त्यानंतर ही माकडे अचानक स्थालांतरीत झाली होती. गेल्यावर्षी रेल्वेच्या ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एका माकडाला शॉक लागल्याने ते जखमी झाले होते. डोंबिवलीत फिरणार्‍या माकडांचा शोध घेत असताना ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एक माकड जखमी अवस्थेत आढळून आले. गेल्या अनेक दिवसांनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी क्षेत्रात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक एक जाडजूड माकड अवतरले. मिलापनगरमध्ये असलेल्या इमारतींच्या आवारात हे गाढवासारखे दिसणाऱ्या या जाडजूड माकडाला काही रहिवासी खायलाही देत आहेत.

गाढवासारखे दिसणारे हे माकड कुठून व केव्हा आले याची माहिती मिळत नाही. सद्या त्याचे वास्तव्य मिलापनगरमधील झाडांवर असते. त्याचा नेमका ठाव घेता येत नसल्याचेही सांगण्यात येते. आतापर्यंत या माकडाने कुणाचा चावा घेतल्याचे अथवा नुकसान केल्याची तक्रार वनविभागाकडे आलेली नाही. मात्र, वाढती मानवी वस्ती आणि कमी होणारी जंगले यामुळे माकडांचा नैसर्गिक खाद्यस्रोत नष्ट होत आहे. त्यात पर्यटक हे माकडांना स्वतःकडील अनैसर्गिक खाद्य देतात. त्यामुळे आयते खाणे मिळत असल्याने माकडं शहरी वस्तीकडे येतात, असे या भागातील जाणकारांनी सांगितले आहे.

शहरात घुसलेले माकड पाळीव असल्याचा संशय प्राणी मित्रांनी व्यक्त केला आहे. माकड हा प्राणी वन्य जीव असल्याने त्याला पाळणे कायद्याने गुन्हा आहे. माकडाचे खेळ करताना आता पकडले जाण्याच्या भितीने मदाऱ्यांनी त्यांच्याकडील माकडे मोकाट सोडून दिल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मलंग गडावर माकडांचा मोठा वावर असतो. तेथून हे डोंबिवलीत आले असावे, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Intro:kit 319Body:डोंबिवलीत अवतरले जाडजूड माकड; बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ 

ठाणे :- भटक्या कुत्र्यांच्या उपद्व्यापांमुळे हैराण झालेल्या डोंबिवलीकरांना यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी माकडांचे दर्शन झाले होते. आता एमआयडीसीच्या निवासी विभागात मंगळवारी दुपारच्या सुमारास इकडेतिकडे फिरणारे गाढवासारखे दिसणारे जाडजूड माकड आढळून आले. यामुळे बच्चे कंपनीसह नागरिकांची पळापळ   झाल्याचे पाहावयास मिळाले. या माकडाला परिसरातील रहिवाश्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. इमारतीच्या गच्चीवर पक्षी पाहण्याची सवय असलेल्या डोंबिवलीकरांना त्याजागी माकडही सहजतेने नजरेस पडत आहे. 

   यापूर्वी ठराविक भागांमध्ये दिसणाऱ्या माकडांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. तेव्हा शहरातील विविध भागांमध्ये किमान 10 ते 12 माकडे असल्याचा अंदाज नागरिकांकडून वर्तविण्यात आला होता. काही महिन्यापूर्वी फडके रोडसह एमआयडीसी भागामध्ये आढळलेल्या माकडांना नागरिकांकडून खाद्य पुरविण्यात आले. मात्र त्यानंतर ही माकडे अचानक स्थालांतरीत झाली. गेल्यावर्षी रेल्वेच्या ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एका माकडाला शॉक लागल्याने तो जखमी झाले. डोंबिवलीत फिरणार्‍या माकडाचा शोध घेत असताना ठाकुर्ली येथील पॉवरहाऊसमध्ये एक माकड जखमी अवस्थेत आढळून आले. गेल्या अनेक दिवसांनंतर डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक माकड अवतरले. मिलापनगरमध्ये असलेल्या इमारतींच्या आवारात हे गाढवासारखे दिसणारे जाडजूड माकड फिरताना दिसत असून काही रहिवासी त्याला खाणेही देऊ लागले आहे. त्यामुळे हे माकड इकडेतिकडे उडताना आढळून येते. हे माकड सद्यातरी कुणाला कोणाला त्रास देत नसले तरी इतरत्र फिरताना मात्र रस्त्यावरची भटकी कुत्री त्याचा मागे लागून भुंकत राहतात.

गाढवासारखे दिसणारे हे माकड कुठून व केव्हा आले याची माहिती मिळत नाही. सद्या त्याचे वास्तव्य मिलापनगरमधील झाडांवर असते. हे दिसताच अवघ्या काही मिनिटांत ते झाडावर उडी घेत असल्याने त्याचा नेमका ठाव घेता येत नसल्याचेही सांगण्यात येते. आतापर्यंत या माकडाने कुणाचा चावा घेतल्याचे अथवा नुकसान केल्याची तक्रार वनविभागाकडे आलेली नाही. मात्र वाढती मानवी वस्ती आणि कमी होणारी जंगले यामुळे माकडांचा नैसर्गिक खाद्यस्रोत नष्ट होत आहे. त्यात पर्यटक हे माकडांना स्वतःकडील अनैसर्गिक खाद्य देतात. त्यामुळे आयते खाणे मिळत असल्याने माकडे शहरी वस्तीकडे येतात, असे या भागातील जाणकाराने सांगितले. शहरात घुसलेले माकड पाळीव असल्याचा संशय प्राणी मित्रांनी व्यक्त केला आहे. माकड हा प्राणी वन्य जीव असल्याने त्याला पाळणे कायद्याने गुन्हा आहे. माकडाचे खेळ करताना आता पकडले जाण्याच्या भितीने मदाऱ्यांनी त्यांच्याकडील माकडे मोकाट सोडून दिल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे मलंगगडावर माकडांचा मोठा वावर असतो. तेथून हे माकड मजल दरमजल करत डोंबिवलीत आले असावे, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. 
Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.