ETV Bharat / state

shopkeeper beaten by women : महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या दुकानदाराला महिलांनी दिला बेदम चोप

author img

By

Published : Apr 4, 2022, 1:56 PM IST

बदलापुर पश्चिम भागातील हेंद्रेपाडा येथील एक दुकानदार दुकानात येणाऱ्या महिलांशी असभ्य वर्तन ( treated the woman rudely) करायचा. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांसह (Women activists of Shiv Sena) पीडित महिलांनी त्याला दुकानदाराला चांगलाच चोप दिला (shopkeeper beaten by women) आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पुष्पराज परिहार असे त्या दुकानदाराचे नाव आहे.

shopkeeper beaten by women
दुकानदाराला महिलांचा चोप

ठाणे: विक्षिप्त पुष्पराज परिहार याचे अंजली नगर भागात अनामिका नोवेल्टी नावाचे दुकान आहे. या दुकानात येणाऱ्या प्रत्येक तरुणी आणि महिलांकडून रोख रक्कम न घेता. तो गुगल पे करायला सांगायचा. त्यामुळे त्या महिलांचा नंबर त्याच्याकडे यायचा. नंतर या महिलांचे व्हाट्सअपला असलेल्या डीपी त्याचे स्क्रीनशॉट मारून तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा. नंतर त्यांना व्हाट्सअप वर मेसेज करून व्हिडिओ कॉल आणि नंतर फोन करून नाहक त्रास देत होता.

दुकानदाराला महिलांचा चोप

अशाच एका पीडित महिलेला त्याने त्रास दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी या विक्षिप्त दुकानदाराला चांगला चोप दिला. खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासणी केला असता सुमारे ५० महिलांचे नंबर काही फोटो आणि मॅसेज सापडले. दुकानदाराच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.