ETV Bharat / state

मीरा रोडमध्ये उद्यानाचे छप्पर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

मीरा रोडच्या शांतीनगर येथील प्रमुख उद्यानाच्या छतावर झाड कोसळल्यने छत पडले. सुदैवाना यात जीवितहानी झाली नसून वित्त हानी झाली आहे.

author img

By

Published : Oct 27, 2020, 7:12 PM IST

नुकसान झालेले शेड
नुकसान झालेले शेड

मीरा-भाईंदर (ठाणे) - मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर-7 च्या प्रमुख स्वामी महाराज पार्क या उद्यानाचे काम भाजपचे नगरसेवक दिनेश जैन यांच्या नगरसेवक निधीतून करण्यात आले होते. तर या ठिकाणी फायबरच्या पत्र्यांचे छत बनवून काम उद्यानाच्या अंतर्गत काम केले होते. जवळच एक झाड कोसळल्याने हे छत कोसळले. तथापि, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

याबाबत महापालिका उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्याठिकाणी झाड पडून टिनशेड व लोखंडी अँगलचे मोठे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्ती करून घ्यायला सांगितले आहे. सुदैवाने कोरोनामुळे उद्यान बंद असल्याने जीवितहानी झालेली नाही. मात्र, त्याठिकाणी मोठी आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा - मीरा भाईंदर महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीवर भाजपचा झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.