ETV Bharat / state

येत्या शनिवारी ‘ब्ल्यू मून‘ योग - कोजागिरीचा चंद्र हा ब्ल्यू मून

यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग आला होता. आता यानंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी तसाच ‘ब्ल्यू मून‘ योग येणार आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी आश्विन पौर्णिमा सुरू होईल.

ठाणे
ठाणे
author img

By

Published : Oct 29, 2020, 10:30 PM IST

ठाणे - येत्या शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग येत आहे. एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून‘ असे म्हटले जाते. परंतु, या दिवशी चंद्र प्रत्यक्षात निळा दिसत नाही. त्यामुळे खगोलशास्त्रीयदृष्ट्या ब्ल्यू मून योगाला तसे विशेष महत्त्व देण्यात येत नाही, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

येत्या शनिवारी ‘ब्ल्यू मून‘ योग

कोजागिरीचा चंद्र हा ‘ब्ल्यू मून‘ असणार आहे

ऑक्टोबरमध्ये १ तारखेला अधिक आश्विन पौर्णिमा होती आणि ३१ ऑक्टोबर रोजी निज आश्विन पौर्णिमा येत आहे. एखादी दुर्मिळ घटना असली तर आपण ‘वन्स इन ए ब्ल्यू मून‘ म्हणतो. वस्तुत: एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येणे हा काही तसा दुर्मिळ योग नाही. यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी ‘ब्ल्यू मून‘ योग आला होता. आता यानंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी तसाच ‘ब्ल्यू मून‘ योग येणार आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी आश्विन पौर्णिमा सुरू होईल. त्या दिवशी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री कोजागरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. त्यामुळे यावेळच्या कोजागिरीचा चंद्र हा ‘ब्ल्यू मून‘ असणार आहे. शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी आश्विन पौर्णिमा समाप्त होत आहे, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.