ETV Bharat / state

ठाणे जिल्हा परिषदेच्या सभापतींनी कोविड रूग्णांसाठी दिले स्वतःला मिळणारे मानधन - ठाणे जिल्हा परिषद सभापती

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला असून कोविड काळातदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली आहे.

सभापती कुंदन पाटील
सभापती कुंदन पाटील
author img

By

Published : Apr 27, 2021, 4:42 PM IST

ठाणे - कोविड काळात रुग्णांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. दानशूर मंडळी सढळ हाताने सहकार्य करत आहेत. असे असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापतीने या परिस्थितीचे भान राखत त्यांना मिळणारे मानधन, सर्व भत्ते कोविड रुग्णांसाठी खर्च करावेत, असे लेखी निवेदन त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

आरोग्य व्यवस्थेची पाहणी

भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्णा गटाचे कुंदन पाटील हे प्रतिनिधीत्व करत असून सध्या ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला असून कोविड काळात देखिल प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली आहे.

'तुळशीरत्न कन्या योजना सुरू'

ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असून मुलींच्या जन्माचे स्वागत कुटुंबात व्हावे यासाठी त्यांच्या दापोडे ग्रामपंचायत क्षेत्रात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी त्यांनी वडिलांच्या नावे 'तुळशीरत्न कन्या' ही योजना सुरू केली असून आपल्याकडून कोरोना काळात छोटीशी मदत व्हावी यासाठी आपले मानधन व मिळणार भत्ते गरजू रुग्णांना मदत व्हावी याकरीता दिले. त्यामुळे मला निश्चितच समाधान मिळेल. यापुढे देखील अशाचप्रकारे शक्य होईल तेवढी मदत मी कोरोना रुग्णांसाठी करणार आहे, अशी प्रतिक्रिया सभापती कुंदन पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.