ETV Bharat / state

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

author img

By

Published : Aug 3, 2019, 6:20 PM IST

येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असले तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

ठाणे - सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलूंड, सायन, कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून या रुळावरील ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकल काही काळ बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रवासी ठाणे ते मुलूंड रेल्वे रुळांवरून चालत जात आहेत.

सायन कुर्ला स्थानकात पाणी; मध्य रेल्वेची ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प

ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सेवा मध्य रेल्वेने सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळत आहे. येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असले तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

आज सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना घरी परतण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवासी लोकलची वाट बघत ताटकळत उभे आहेत. मात्र, रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांमध्ये संतपाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Intro:मध्य रेल्वेची वाहतूक बंद सायन कुर्ला स्थानकात पाणी साचलेBody: सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुर्णत: ठप्प झाली असून ठाणे ते मुलूंड रेल्वे रुळांवरुन प्रवासी चालत जातायेत... सतत पडत असलेल्या पावसामुळे मुलूंड, सायन, कुर्ला दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने या ठिकाणांहून रेल्वे चालवणे धोक्याचे होऊ शकते यामुळे खबरदारी म्हणून काही काळ या रुळांवर लोकल सेवा बंद करण्यात आलीये... तर ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सेवा मध्य रेल्वेनं सुरु ठेवल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळतोय... पाऊस अजून पुढील काही तास मुसळधार पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला असल्याने जर असाच मुसळधार पाऊस पुढील काही तास पडला तर जनजीवन विस्कळीत होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी त्यांना आवश्यकच असेल तरच घरा बाहेर पडावे अशा सुचना शासनाने केल्या आहेत... सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांना घरी परतण्यासाठी आता देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रेल्वे प्रवाशी लोकल ची वाट बघत ताटकळत उभे आहेत यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाच वातावरण आहे तर काही प्रवाशी मुलुंड-ठाणे-कळवा असा रेल्वे रुळावरून पायी प्रवास करत आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी
WKT - मनोज देवकर ( प्रतिनिधी,ठाणे )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.