ETV Bharat / state

Pandurang Barora : माझी चूक झाली, माफ करा...शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दे धक्का, शिंदेंचे विश्वासू पवारांच्या गळाला

Pandurang Barora : पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु २०१९ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात 'मातोश्री'वर जाऊन हाती शिवबंधन बांधले होतं. परंतु पांडुरंग बरोरा हे लवकरच शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. (Pandurang Barora On Sharad Pawar Group)

Pandurang Barora
पांडुरंग बरोरा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 10:27 PM IST

ठाणे Pandurang Barora : राज्यात सत्ता संघर्षानंतर जशी शिवसेना दोन गटात विभागली गेली, तशीच काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतही मोठी फूट पडून वेगळा अजित पवार गट (Ajit Pawar Group) स्थापन झाला. मात्र येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचं (Loksabha Vidhansabha Elections) राजकीय गणित मांडून फूट पडलेल्या दोन्ही पक्षातील लोकप्रतिनिधी आणि नेते आप आपल्या पक्षात वापसी करताना दिसत आहे. त्यापैकी मुख्यमंत्री शिंदेंचे (Eknath Shinde) विश्वासू साथीदार म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्यात ओळख असलेले शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे, शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार (Pandurang Barora On Sharad Pawar Group) असल्यानं पवारांच्या गळाला शिंदे गटाचा मोठा नेता लागल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिंदे गटात केला होता प्रवेश : शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे २०१४ मध्ये शहापूर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. त्यावेळी शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत २०१९ मध्ये प्रवेश करत शिवसेनेतून विधानसभा लढवली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे आमदार दौलत दरोडा यांनी राजकीय खेळी करत २०१९ साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत शहापूर विधानसभेत निवडून येत बाजी मारली. मात्र राज्याच्या सत्ता संघर्षानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेते पक्षांतर झाल्यानं माजी पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.

राजकीय समीकरणे बदलणार : आता मात्र आगामी २०२४ मध्ये शहापूर विधानसभेचे तिकीट कोणत्या पक्षाला मिळेल यावर पुन्हा आजी-माजी आमदार भवितव्य अवलंबून आहे. मात्र महाविकास आघाडी झाली तर शहापूर विधानसभा शरद पवार गटाकडे जाईल, या आसेवर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. यामुळे शहापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील जनता तिसरा पर्याय निवडण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसत आहे.

हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश : पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेवर गेले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. १९८० पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने पक्षासोबत फारकत घेतली होती. आता बरोरा हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडेल. अशी माहिती माजी आमदार बरोरा यांनी दिली आहे.

२०१९ ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलो खऱ्या अर्थाने ती माझी चुक झाली. आमच्या काकाने मला सल्ला दिला, मी शरद पवारांची भेट घेतली. यामुळे शहापूर विधानसभेचे माजी आमदार व सद्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पांडुरंग बरोरा आपल्या समर्थकासह शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. दरम्यान, बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे ४ वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. शहापूर तालुक्यात त्यांनी विकास कामे केली. त्यामुळे शहापूर परिसरात त्यांचा दबदबा आहे. - पांडुरंग बरोरा ,शहापूर विधानसभेचे माजी आमदार

दरोडा यांच्या विरोधात बरोरा मैदानात : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आणि त्यांनी स्वत:हून पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोरा सोबत गेले खरे, पण काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चाही शहापूरच्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, पण शरद पवार यांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे. शहापूरमध्ये सध्या दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे शरद पवार आता दरोडा यांच्या विरोधात पांडुरंग बरोरा यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On BJP : देशात दिवसेंदिवस भाजपा....; शरद पवारांचा हल्लाबोल
  2. Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत
  3. Sharad Pawar On Chhagan Bhujbal: शरद पवारांनी छगन भुजबळांचा 'तो' आरोप फेटाळला अन् दिला दमदार पुरावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.