ETV Bharat / state

Thane Police : कर्मचाऱ्यानेच साथीदारांसह मारला पेट्रोल पंपाच्या गल्ल्यावर डल्ला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

झटपट पैसे कमविण्याच्या नादात एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. नयन पवार, असे त्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तर निलेश मांडवकर हा त्याचा साथीदार याच पंपावरील ( Petrol Pump ) माजी कर्मचारी होता. या दोघांची मैत्री सुधाकर मोहिते आणि भास्कर सावंत यांच्याशी होती जे अट्टल गुन्हेगार होते. दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे दाखल असून या पेट्रोल पंपावरील जमा होणाऱ्या पैशाबद्दल ऐकून सर्वांनी या ठिकाणी लूट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल साडे सत्तावीस लाख रुपये लुटले. पोलिसांनी ( Thane Police ) चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अटक आरोपी व पोलीस कर्मचारी
अटक आरोपी व पोलीस कर्मचारी
author img

By

Published : Feb 10, 2022, 3:55 PM IST

Updated : Feb 10, 2022, 8:36 PM IST

ठाणे - ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कापूरबावडी पोलीस ( Kapurbawdi police ) ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्रॉडवे पेट्रोल पंपावर 31 जानेवारीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे साडे 27 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे यातील एकजण या पंपावर ( Petrol Pump ) काम करत होता.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

झटपट पैसे कमविण्याच्या नादात एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. नयन पवार, असे त्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तर निलेश मांडवकर हा त्याचा साथीदार याच पंपावरील माजी कर्मचारी होता. या दोघांची मैत्री सुधाकर मोहिते आणि भास्कर सावंत यांच्याशी होती जे अट्टल गुन्हेगार होते. दोघांच्याही नावावर अनेक गुन्हे दाखल असून या पेट्रोल पंपावरील जमा होणाऱ्या पैशाबद्दल ऐकून सर्वांनी या ठिकाणी लूट करण्याचा निर्णय घेतला. 31 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांनी या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकत एकूण साडे सत्तावीस लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. पोलिसांनी ( Thane Police ) चौघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी घेतला 35 सीसीटीव्हीचा मागोवा - या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी परिसरातील जवळपास 35 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनायकुमार राठोड ( DCP Dr. Vinayakkurmar Rathod ) यांनी दिली.

हेही वाचा - हिजाब समर्थनार्थ ठाण्यात हिंदू-मुस्लीम महिला रस्त्यावर, मुस्लिम महिलांनी दिले 'जय श्री राम', 'अल्लाह हू अकबर'चे नारे

Last Updated : Feb 10, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.