ETV Bharat / state

Thane Murder News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या; प्रियकर फरार - ठाण्यात महिलेची हत्या

Thane Murder News : आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं प्रमाण वाढलंय. त्याच तुलनेत गुन्ह्यांचं प्रमाण देखील वाढतंय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर मात्र तिचा प्रियकर फरार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Thane Murder News
महिलेची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 6:19 PM IST

ठाणे जिल्ह्यात महिलेची हत्या

ठाणे Thane Murder News : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील किचनमध्ये आढळलाय. गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. त्यामुळं एकच खळबळ उडालीय. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर (शामबाग) मधील एका घरात घडलीय. मात्र, तिच्यासोबत राहणारा तिचा प्रियकर फरार झालाय. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी फरार झालेल्या प्रियकराचा शोध सुरू केलाय. शबीर (रा. अंबरनाथ) असं हत्या करून फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे.

दोघांमध्ये अनैतिक संबध : पोलिस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिला आणि आरोपी हे अंबरनाथ शहरातील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन प्रेमाचं सूत जुळलं. दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांनी भिवंडी तालुक्यात खोली भाड्याने घेतली. त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहात होते. विशेष म्हणजे काही महिने मृतक महिलेची मैत्रीण देखील तिच्यासोबत राहत होती. त्यातच १५ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं. आरोपी शबीरनं त्याच्या प्रेयसीचा गळा चिरला. तसंच दोन्ही हातच्या नसा कापून तिला ठार मारलं. त्यानंतर घराला बाहेरून कुलुप लावून तो पळून गेला असा आरोप आहे. (Murder of woman living in live in relationship)

महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत : १८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खोलीतून दुर्गंध येत होती. त्यामुळं आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक दीप बने हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात गेले असता, घरातील किचनमध्ये या महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर कोनगाव पोलिसांसह , गुन्हे शाखा पथक, फॉरेन्सिक पथक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. मात्र मृतदेह कुजलेला असल्यानं उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवला आहे. (thane crime)

घटनास्थळावरून धारदार कटर जप्त : मृतक महिलेच्या मैत्रीणीच्या तक्रारीवरून आरोपी शबीर याच्यावर आज पहाटेच्या सुमारास भादंवि कलम ३०२ प्रमाणे कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार कटर जप्त केलंय. त्या खोलीत मृत महिला एकटीच राहात होती. मात्र कधी-कधी तिच्यासोबत आणखी एक महिला किंवा एक पुरुषही राहात होता, अशी माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळालीय.

महिलेच्या हत्येचं कारण : याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपीच्या शोधात कोनगाव पोलिसांची दोन पथकं तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकानं समांतर तपास सुरू केलाय. लवकरच आरोपीला पकडलं जाईल. त्यानंतरच या महिलेच्या हत्येचं कारण समोर येईल, अशी माहिती त्यांनी दिलीय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीप बने करीत आहेत.

हेही वाचा :

  1. Nashik Murder Case : 'लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या
  2. Nagpur Murder case : महिला हत्या प्रकरणात आरोपीसह काँग्रेस आमदार संजय शर्माची समोरासमोर चौकशी सुरू
  3. BJP Women Leader Murder Case : तो मृतदेह 'त्या' महिला नेत्याचा नाहीच! डीएनए चाचणीत धक्कादायक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.