ETV Bharat / state

कोव्हिड रुग्णालयांकडून जादा बिलाची आकारणी; ती रक्कम रुग्णांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश - कोव्हिड रुग्णालयांकडून बिलाची आकारणी

महापालिकेने खासगी कोव्हिड रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या कोरोनाबाधिताकडुन किती देयक आकारावे, याचे दर यापूर्वीच निश्चित केले असून त्यानुसार रुग्णालये आकारणी करतात किंवा नाही याची तपासणी होणार आहे. यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता.

Thane Municipal Corporation
संग्रहित
author img

By

Published : Jul 19, 2020, 7:06 AM IST

ठाणे - महापालिकेने घोषित केलेल्या खासगी कोव्हिड रुग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई होणार आहे. तसेच सदरची वाढीव रक्कम तात्काळ रुग्णांच्या खात्यात परत करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. यासाठी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्त्याखालील विशेष पथकाने शहरातील 15 कोव्हिड रुग्णालयांची तपासणी करून जवळपास 27 लाख रुपयांची 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या सर्व रुग्णालयांना महापालिकेने नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

महापालिकेने खासगी कोव्हिड रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून किती देयक आकारावे, याचे दर यापूर्वीच निश्चित केले असून त्यानुसार रुग्णालये आकारणी करतात किंवा नाही याची तपासणी होणार आहे. यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता.

या पथकाने महापालिका हद्दीमधील जवळपास 15 खासगी कोव्हिड रुग्णालयांची तपासणी केली. त्यांनी कशा प्रकारे रुग्णांना देयक आकारले आहे. याची तपशीलवार माहिती घेतली. या पथकाकडे 15 कोव्हिड रुग्णालयांमधून आतापर्यंत एकूण 1752 देयके प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 486 देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या एकूण 196 आक्षेपित देयकांची रक्कम ही 27 लाखांपेक्षा जास्त आहे.

या सर्व आक्षेपित देयकांबाबत संबंधित रुग्णालयांकडून तत्काळ खुलास मागविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. संबंधित रुग्णालयांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात येईल. तसेच ज्या रुग्णालयांने एखाद्या रुग्णांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचे सिद्ध झाल्यास ती जादा आकारण्यात आलेलली रक्कम संबधित रुग्णाच्या खात्यावर परत करण्यात येणार आहे. यासाठी आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या सर्व रुग्णालयांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.