ETV Bharat / state

ठाणे महापालिका अर्थसंकल्प : कोविड सावटाचा परिणाम, नव्या प्रकल्पांना कात्री

सन २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प फुगवून ४ हजार ८६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र, यंदा फुगवटा नसलेला वास्तवादी अर्थसंकल्प सन २०२१-२२ चा २७५५ कोटी ३२ लाखाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोविडमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने महापालिकेला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या आधारावर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

author img

By

Published : Feb 5, 2021, 7:43 PM IST

ठाणे महापालिका अर्थसंकल्प
ठाणे महापालिका अर्थसंकल्प

ठाणे - कुठलीही दरवाढ किंवा करवाढ नसलेला आणि नव्या प्रकल्पांना कात्री तर, जुन्या अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण करण्याचा मानस ठेवून सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नरेंद्रबल्लाळ सभागृहात सादर केला. अर्थसंकल्पाच्या आकडेमोडीवर कोविडचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत असून पालिका आयुक्तांनीही याला कबुली दिली.

ठाणे महापालिका अर्थसंकल्प

सन २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प फुगवून ४ हजार ८६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र, यंदा फुगवटा नसलेला वास्तवादी अर्थसंकल्प सन २०२१-२२ चा २७५५ कोटी ३२ लाखाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोविडमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने महापालिकेला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या आधारावर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प हा १ हजार ३०० कोटींनी कमी असलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. एकीकडे मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात वाढ केली असतानाही ठाणे पालिकेने मात्र कुठलीही वाढ न करता वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केला.

हेही वाचा - ठाण्यात पालिका अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा गोंधळ

कोरोना प्रादुर्भावामुळे महसुली उत्पन्नात घट

कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा भाग म्हणून देशपातळीवर लॉकडाऊन लागू करावा लागला. त्याचा परिणाम सर्व उद्योगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. कोरोनाच्या आपात्कालीन स्थितीत वैद्यकीय सेवा व सुविधांसाठी मोठया प्रमाणावर निधी खर्च करावा लागला. केंद्र सरकारच्या मदतीनंतर कोविड काळात ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीतील तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला.

कोरोनाने ठाण्याची परिस्थिती गंभीर झाल्याने पालिकेचे मुख्य स्त्रोत असलेले उद्योंग धंदे, मालमत्ता कर आदींची वसुली ठप्प झाले. आज परिस्थिती निवळली असली तरीही कोविडमुक्त ठाणे झालेले नाही. त्यामुळे पालिकेला मिळणाऱ्या महसुली उत्पन्न आणि भांडवली खर्चावर नियंत्रण ठेवून सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात जर महसुली उत्पन्नात वाढ झाल्यास पुन्हा अर्थसंकल्पामध्ये सुधारणा करणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

भांडवली खर्चात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार

ठाणे पालिकेच्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या घोषणा झाल्या असल्या तरीही तो नियोजनाचा भाग आहे. तर, ठाणे पालिकेच्यावतीने सुरू केलेले परंतु निधी अभावी अपूर्ण राहिलेले प्रकल्प हे पूर्ण करून त्याचा लाभ जनतेला होईल, अशा प्रकल्पांना प्रथम पूर्ण करण्याचा मानस या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला. हॉस्पिटल, रोड, आणि इतर विकास कामे हि भांडवली खर्चातून पूर्ण करण्याचा मानस आहे. उत्पन्न वाढल्यास नव्या प्रकल्पांचा विचार निश्चितच करण्यात येणार आहे. तर जुने प्रकल्प जे काही शुल्लक निधी अभावी अटकलेत. काही जुने प्रकल्प ८० ते ९० टक्के पूर्ण आहेत अश्या प्रकल्प आधी पूर्ण कारणाचे ड्रीम ठाणे पालिका आययुक्तांचे आहे. त्याच बरोबर या बजेट मध्ये खर्चावर नियंत्रण असणार आहे .अशी महत्वाची माहिती ठाणे पालिका आयुक्तांनी दिली.

नवीन कर्ज नाही

सन २०२०-२१ मध्ये विकास कामासाठी ५०० रुपयांचे कर्ज कर्ज होते. कोरोनाच्या काळात जरी महसुली तूट झाली तरीही भांडवली खर्चावर नियंत्रण ठेवल्याने सातत्याने कर्जाचे हप्ते देण्यात आले. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला डिफॉल्ट दंड आकारण्यात आलेला नाही. यंदाच्या वर्षी पालिकेला कर्जापोटी १६४ कोटींचे कर्ज देणे आहे. मागील वर्षाची ५६ लाखाची ओपनिंग शिल्लकीसह २ हजार ७५५ कोटी ३२ लाखाचा आर्थिक संकल्प हा ना दरवाढ, ना करवाढ असा सादर केलेला वास्तववादी अर्थसंकल्प आहे.

अनेक प्रकल्प बारगळणार

दरम्यान ठाण्यात अनेक नवे प्रकल्प हे घोषित करण्यात आल्याने सदर प्रकल्प हे नियोजनाचा भाग आहे. तर यापूर्वी ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अशा प्रकल्पाना पूर्ण करून जनतेच्या हिताचे प्रकल्प पूर्ण करून ते जनतेच्या वापरास खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठे नवे प्रकल्पना निधी आणि नियोजनाच्या अभावाने कात्री लागणार आहे. मात्र पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर नव्या प्रकल्पाचा विचार होणार आहे. तर काही प्रकल्प हे महत्वकलांशी असले तरीही लॉँगटर्म असल्याने तो पर्यंत पालिकेची आर्थिक परिस्थिती उभारी घेईल त्यामुळे हे मंजूर प्रकल्पही भविष्यात पूर्ण होतील अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

हेही वाचा - न्यायमूर्ती पुष्पा गनेदीवाला यांना हटवा, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.