ठाणे - महापालिका आयुक्त विकासकांची पाठराखण करतात, असा आरोप करत महापौरांनी मुख्यमंत्र्यांना तक्रारीचे पत्र लिहिले आहे. यामुळे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
महापालिका आयुक्त संजीव जैसवाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी कधी सोडत नाहीत. त्यातच आता महापौरांच्या एका पत्राने चांगलीच खळबळ उडाली आहे. आयुक्त हे सभागृहात नगरसेवकांच्या महत्वाच्या प्रश्नांवेळी गैरहजर राहतात. मात्र, विकासकांची बाजू मांडण्यासाठी ते सभागृहात आवर्जून उपस्थित रहात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे ठाण्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. आयुक्त शासकीय कार्यक्रमात एकदाही उपस्थित राहिले नसून हा आपलाच नाही तर देशाचा अवमान असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी या पत्रात केला आहे. ठाणेकर जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून नगरसेवकांना निवडून दिले आहे.
हे ही वाचा - ठाण्यात आयुक्त सत्ताधारी वाद पेटला, महापौरांनी केले आयुक्तांवर 'हे' आरोप
आयुक्तांनी सभागृहात उपस्थित राहून त्यांचा मान ठेवावा असा समज वजा इशारा त्यांना देण्यात यावा. अशी विनंती देखील महापौरांनी केली आहे. अविश्वास ठरावाचे गोपनीय पत्र राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः आयुक्तांना लिहून दिले असल्याचा घणाघाती आरोप करत आमदारांकडून अशा प्रकारचे पत्र लिहून घेण्याची नामुष्की पालिका आयुक्तांवर आली. असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. एका महिला म्हणून आपल्या हातात असलेल्या बांगड्या अशी कृत्ये करणाऱ्यांच्या हातात असाव्यात असे बोलत त्यांनी हा वाद किती चिघळला आहे. हे यावरून दिसून येते. पालिका आयुक्तांनी नागरीकांच्या समस्या सोडवत नाहीत. आता मुख्यमंत्री यावर काय कार्यवाही करतात याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा - सायबर सुरक्षा ही काळाची गरज; ठाणे पोलिसांकडून कार्यशाळेद्वारे जनजागृती