ETV Bharat / state

दहा महिन्यानंतर लोकल सेवा सुरू; प्रवाशांना करावे लागणार नियमांचे पालन - ठाणे लोकल सेवा न्यूज

लॉकडाऊननंतर तब्बल 10 महिन्यानंतर लोकलसेवा मुंबईकरांसाठी खुली करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Local train
लोकल रेल्वे
author img

By

Published : Feb 1, 2021, 11:35 AM IST

ठाणे - 23 मार्च 2020पासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा आज(सोमवार)पासून निर्धारित वेळेत सुरू झाली आहे. पहाटे 4 वाजता ठाण्यातून पहिली लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून ही पहिली लोकल सुटली आहे. ठाण्यातून उपनगरात आणि मुंबईमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

दहा महिन्यानंतर लोकल सेवा सुरू झाली आहे

सकाळी सात वाजल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर लोहमार्ग पोलीस सर्वसामान्य प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या चाकरमान्यांचे तिकीट व ओळखपत्र तपासणी करूनच पुढे सोडत आहेत. सर्व सामान्य नागरिकांसाठी जी वेळ रेल्वेने दिली आहे त्या वेळेतच त्यांनी प्रवास करावा. अन्यथा रेल्वे लोहमार्ग पोलीस कारवाई करणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी अटी व नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यावर विनाकारण दंड आकारला जाईल, असे देखील लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

रेल्वे पोलिसांची जबाबदारी वाढली -

लोकल सेवेबाबत जे काही सरकारी आदेश येत आहेत, त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासन करणार आहे. रेल्वे पोलिसांनाही जवाबदारी दिली असून त्यांनी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत कारवाई करायची आहे.

या वेळेत करता येईल प्रवास

सर्व सामान्यांना निर्धारित वेळेत हा प्रवास करता येणार आहे. पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी सात वाजेपर्यंत सकाळच्या वेळेत हा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना करता येणार आहे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवास करता येइल. तर रात्री 9 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्ण नसला तरी काही प्रमाणात या निर्णयाचा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. टप्याटप्याने लोकल सेवा सुरू केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी आधीच दिले होते. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर महिलांसाठी निर्धारित वेळेत ही सेवा देण्यात आली. आणि आता सर्वसामान्य लोकांसाठी ही सुविधा दिल्याने पूर्ण नसला तरी काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.