ठाणे - कल्याण पश्चिममधील एका चौकात दोन जणांमध्ये ( Kalyan Two Man Fight )वाद झाला. त्यातून कारचालकाने वाद घालणाऱ्या तरुणाला फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Car Driver Rams Into Him ) आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या घटनेत तरुण बचावला आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
प्रवीण चौधरी असे कारचालकाचे नाव असून, तो नवीमुंबईत राहणारा आहे. तर घटनेतून बचावलेल्या तरुणाचे नाव त्रिवेश असून, तो कल्याणमध्ये राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार शोधत प्रवीण चौधरीवर मोटर वाहन कायद्यानुसार कलम १८४, २७९, १७७, ८, १८१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावत त्याला सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण चौधरी याचे कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय त्रिवेशला होता. बुधवारी नवी मुंबईहुन कारने प्रवीण त्या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचे त्रिवेशला समजले. त्रिवेशने दुचाकीवरुन पाठलाग करत आधारवाडी चौकात प्रवीणला गाठले. त्यानंतर दुचाकीवरुन उतरत त्रिवेश कार समोर उभा राहिला प्रविणशी वाद घालायला लागला. हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
त्यानंतर काही वेळाने सिग्नल सुटल्यानंतर, प्रवीणने कार समोर उभ्या असलेल्या त्रीवेशला चक्क काही अंतरावर फरफरट नेले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. त्यानंतर गुरुवारी वाहतूक पोलिसांनी कार चालक प्रवीण चौधरीवर गुन्हा दाखल केला होता. तर, हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आज ( शुक्रवार ) जीवेमारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादंवी 307 कलमानुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
हेही वाचा - Go Back Modi Banner In Pune : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात 'मोदी गो बॅक'चे पोस्टर