ठाणे- डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात हल्लेखोर पती विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुरेश पैलकर (वय ५२) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर पतीचे नाव आहे.
वाढदिवस असल्याने पत्नी घरी परतली: गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्हांवरून समोर आले असतानाच, पुन्हा रक्तरंजित कौटूंबिक हिंसाचाराची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लखोर पती डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत २८ वर्षीय मुलासह राहतो. तर गेल्या दोन वर्षांपासून जखमी पत्नी आणि हल्लेखोर पतीमध्ये घरगुती वाद असल्याने त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे पत्नी सुलोचना ही आपल्या माहेरी कर्नाटक येथे राहत आहे. त्यातच ३० ऑगस्ट रोजी पत्नी आणि हल्लेखोर पतीच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने पत्नी माहेर हुन डोंबिवलीत पतीच्या घरी आली होती.
मुलालाही केली मारहाण: ३० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर हल्लेखोर पती हा आपल्या बेडरूममध्ये रात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी गेला होता. त्यावेळी पत्नी मात्र बेडरूममध्ये न जाता ती दुसऱ्या रूममध्ये झोपल्याला गेली असता, हल्लेखोर पतीने पत्नीला आपल्या बेडरूममध्ये सोबत झोपण्यासाठी सांगितले. मात्र पत्नीने नकार देताच, दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून हल्लेखोर पतीने घरातील धारदार सुरीने पत्नीवर वार केले. हे पाहून मुलगा भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आला असता, हल्लेखोराने त्यालाही मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत मुलाने आईला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल: या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मुलगा सुरज (वय २६) याच्या तक्रारीवरून डोंबविली पोलीस ठाण्यात हल्लेखोर पतीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करीत आहेत.