ETV Bharat / state

Thane Crime : जिलेटिनच्या कांड्यासह डेटोनेटर्स सापडल्यानं पोलीस अलर्ट..याच ठिकाणी मनसुख हिरेनचा सापडला होता मृतदेह! - Illegal sand mining started

Thane Crime मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या, डेटोनेटर्स मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकूण 16 जिलेटिनच्या कांड्या, 17 डेटोनेटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत.

gelatin-sticks
Egelatin-sticks
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 5:27 PM IST

अनेक दशकांपासून अवैध वाळू उत्खनन सुरू

ठाणे Thane Crime : मुंब्रा रेतीबंदर किनारी जिलेटिनच्या कांड्या, डेटोनेटर्स मिळाल्यानं चिंता वाढली आहे. ही स्फोटकं पाण्याखाली स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येतात अशी माहिती देण्यात आली. परंतु या कांड्यांपैकी अनेक कांड्या जिवंत असल्यानं त्यांचा इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी वापर होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीय.

अवैधरित्या रेती उत्खनन सुरू : मुंब्रा रेती बंदर हे मृतदेह फेकण्यासाठी एक कुख्यात ठिकाण बनलंय. तसंच इथं वर्षानुवर्षे अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहासोबतच या ठिकाणी 16 मृतदेहही सापडले आहेत. मात्र, आज पुन्हा एकदा जिलेटिनच्या काड्या, डिटोनेटर्सच्या शोधानं हे ठिकाण प्रकाशझोतात आलंय. कोट्यवधी रुपये खर्च करून कळवा रेती बंदर परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. या भागातील निसर्गरम्य वातावरण लक्षात घेऊन महापालिकेनं ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली, मात्र आता ही सुविधा नागरिकांसाठी धोकादायक मानली जात असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

वर्षभरात 15 मृतदेह सापडले : गेल्या वर्षभरात या परिसरात 15 मृतदेह आढळून आले असून, दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळं गेन्हेगार मृतदेह परिसरात फेकून पसार होताय. पोलीस, महापालिकेचा हलगर्जीपणा होत असल्यानं असे प्रकार इथं वारंवार घडत आहेत. या भागात महामार्गावर पोलीस नसल्यामुळं याचा फायदा घेत मृतदेह खाडीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न गुन्हेगार करतात.

पोलिसांवर प्रश्नचिन्ह : आता या ठिकाणी जिवंत जिलेटिन, डिटोनेटर्सच्या कांड्या सापडल्यानं प्रशासनाला धक्का बसला आहे. याआधीही दहशतवाद्यांनी जिलेटिनच्या कांड्या वापरून अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत. त्यामुळं खाडीकिनारी गस्त वाढवण्याची गरज आहे. एवढी गंभीर घटना घडल्यानंतर तहसीलदार घटनास्थळी हजर नव्हते. त्यामुळं त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक सचिन भोईर यांनी प्रतिक्रिया देताना मी प्रतिक्रिया देणं योग्य होणार नसल्याचं म्हटलयं.

घटनेचा सखोल तपास सुरू : घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस, बॉम्बशोधक पथकानं 16 जिलेटिन कांड्या, 17 डिटोनेटर, दोन मोठ्या बॅटरीसह साहित्य जप्त करून कसून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून मोबाईल फोनही जप्त करण्यात आलाय. त्यावरील आयएमईआय क्रमांकाचा वापर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जिलेटिनच्या कांड्या, डिटोनेटर्स कशासाठी घेतले याचाही सखोल तपास करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

  • मुंब्रा अतिसंवेदनशील क्षेत्र : मुंब्रा परिसर हा अनेक वर्षांपासून संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात गुन्हेगारांचं बस्तान बसलंय. त्यामुळं या भागात आयबी, तत्सम एजन्सी नेहमीच येत असतात. असं असतांना देखील गुन्हेगारीचं प्रमाण कमी होतांना दिसत नाहिय.

  • अवैध वाळू उत्खनला कोण जबाबदार : मुंब्रा रेती बंदर परिसरात गेल्या अनेक दशकांपासून अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाला यावर कोणताही आवर घालता आलेला नाही. तसंच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हेही वाचा -

  1. Ahmednagar Murder Case: मजुरीचे पैसे मागितल्याचा राग; चौघांनी एका मजुराला संपवलं....
  2. Live in Partner Killed Woman : बलात्काराची तक्रार मागं घेण्यासाठी तरुणीचा लिव्ह इन पार्टनरकडून खून; सुटकेसमध्ये मृतदेह भरुन गुजरातमध्ये फेकला
  3. Minor Burn Cigarette : आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून चार वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके, नराधमाकडून मुलांचा छळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.