ETV Bharat / state

Thane Crime News: ठाण्यात ६१.२ लाखांचे अमली पदार्थ जप्त, दोन नायजेरियनसह रिक्षाचालक गजाआड

ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने कारवाई केली. अमली पदार्थाचे साठे जप्त केले. ६१.२ लाखाच्या कोकेन एलएसडीसह दोन नायजेरियन आणि एका रिक्षाचालकाला अटक केली.

Thane Crime News
अमली पदार्थ साठ्यासह अटकेच्या दोन घटना
author img

By

Published : Apr 2, 2023, 8:48 AM IST

ठाणे : २९ मार्च आणि ३१ मार्च रोजीच्या दोन घटनांमध्ये एका घटनेत एक नायजेरियन आणि रिक्षाचालक यांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखेने कासारवडवली पोलीस ठाण्यात एका नजेरियन आरोपीवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक करीत आहे. या दोन्ही घटनेत पोलिसांनी तब्बल १४७ ग्राम कोकेन आणि ०.२२ ग्रॅम वजनाचे एलएसडीचे १५ नग असा ६१ लाख २ हजार ९४० रुपये किमतीचे अमली पदार्थ, रोकड आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.

मुद्देमाल हस्तगत : २९ मार्च रोजी ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना घोडबंदर रोडवरील द बाईक सुरज प्लाझा हॉटेलचे गेट समोर, आनंदनगर, ठाणे येथे एक नायजेरियन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापाला रचून नायजेरियन पॉल चुकवु ( वय ४८) रा. तुळींज, नालासोपारा याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १२ लाख ८० हजार रुपयांच्या किमतीचे ३२ ग्राम कोकेन आणि १ लाख २० हजाराचे ०.२२ ग्राम एलएसडीचे १५ नग तसेच १ हजार ९४० रुपये रोख आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. एकूण १४ लाख १ हजार ९४० रुपये इतका मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी नायजेरियन इसमाच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरी कारवाई ३१ मार्च, २०२३ रोजी ठाण्याच्या इंदिरा नगर, वागले इस्टेट परिसरात केली.

कसा झाला ट्रॅप : पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन व्यक्ती हा कोकेन विक्रीसाठी श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलीस पथकाने शिवसेना शाखेसमोर, इंदिरानगर, वागळे इस्टेट येथे सापळा रचला. या सापळ्यात नायजेरियन गोक लॉरेन्स अजाह (वय ३२) आणि मुद्देमाल रिक्षातून घेऊन वाहतूक करणारा रिक्षाचालक लक्ष्मण अनिरूध्द साव (२७) हे तिघे अडकले. त्यांच्या अंगझडतीत रिक्षातील ४६ लाख रुपये किमतीचे ११५ ग्राम कोकेन, एक रिक्षा आणि एक हजार रुपये रोख असा ४७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दोघांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कानडे हे करीत आहेत.

६० लाखांचे एमडी ड्रग्स जप्त : भायखळ्यातील मदनपुरा परिसरात 11 मार्चला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मोठी कारवाई केली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने वांद्रे परिसरातुन ६० लाखांचे एमडी ड्रग्स जप्त केले होते. तसेच या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मुंबई शहरातील अमली पदार्थ तस्करांना पकडण्यात यश आले होते. अमली पदार्थांची विक्री विक्रेत्यांवरकडे प्रत्येकी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम मेफेड्रोन सापडले होते.

हेही वाचा : MD Drugs Seized : अमली पदार्थ विरोधी पथकाने 60 लाखांचे एमडी ड्रग्स केले जप्त, दोघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.