ठाणे Thane Crime : आरोपीने मित्र झोपेत असतानाच, त्याची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील खडेगोळवली गावातील एका कारखान्यात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतक अनिलकुमार यादव व आरोपी हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत होते. ते कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात एका चपलीच्या कारखान्यात काम करणारे होते. सोमवारी हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले असता, त्यावेळी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादाच्या दरम्यान आरोपी हिरालालने आज रात्री तुला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने अनिलकुमार याच्या झोपण्याची वाट पाहिली. आरोपी रात्रभर जागा राहिला. अनिलकुमार हा झोपल्याचे पाहून आरोपी हिरालालने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा खून केला.
मित्रांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल-मंगळवारी सकाळच्या सुमारास जेव्हा मृत अनिलकुमारचे इतर मित्र त्याला झोपेतून उठवण्यात आले असता, तर तो जागेवरून उठला नाही. हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांचे एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत अनिलकुमारचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून घटनेचा तपास सुरू केला.
खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट- दुसरीकडे अनिल कुमार याच गळा आणून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. पोलीस तपासात प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी हिरालाल याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने अनिल कुमारचा खून केल्याचं पोलिसांना सांगितले. हिरालाल याला अनिलकुमारच्या खून प्रकरणी अटक केल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. कोळसेवाडी पोलीस पथक या गुन्हाचा पुढील तपास करत असल्याचे एसीपी कल्याण घेटे यांनी सांगितले.
हेही वाचा-