ठाणे - कोरोनाच्या संकटकाळात सर्वांवरच घरी बसण्याची वेळ आली आहे. नाकरिकांना पैशांची चणचण भासतेय अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने भरमसाट वीज बील पाठवल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. ठाणे भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर वाढीव वीज बील प्रकरणी आंदोलन केले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महावितरणने अनेकांना सरासरी पेक्षा दुप्पट, तिप्पट किवा त्याहून जास्तची बिले पाठवली आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढीव वीजबिलांच्या विरोधात ठाण्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी आंदोलन केले. भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर विद्यमान ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. "दरवाढ रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा" अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. उपजीविकेचे सर्व मार्ग बंद असताना दुकानदार आणि नागरिकांनी केलेली ही भरमसाट वीजबिले कशी भरायची, असा प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.
ठाकरे सरकारने ही वीजबील दरवाढ रद्द करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.